शिवाजी विद्यापीठ अभियंता दिवस सजारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यापीठ अभियंता दिवस सजारा
शिवाजी विद्यापीठ अभियंता दिवस सजारा

शिवाजी विद्यापीठ अभियंता दिवस सजारा

sakal_logo
By

विद्यापीठात प्रशांत हडकर यांचे मार्गदर्शन
कोल्हापूर, ता. १५ ः शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात अभियंता दिन झाला. अभियंते प्रशांत हडकर यांनी बी. टेक सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी ‘इनोव्हेटिव्ह मटेरियल्स ॲंड कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी’ या विषयावर मार्गदर्शन केले. सुरुवात प्रभारी संचालक डॉ.पी.डी.पाटील यांनी विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून केली. यावेळी हडकर म्हणाले, ‘सध्याच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा वेग प्रचंड असून, नवीन बांधकाम मटेरियल्स वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मटेरियल सायन्सचा अभ्यास अत्यावश्यक आहे. कार्बन डाय-ऑक्साइड ची निर्मिती कमी करणे हे सध्याच्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीसमोरील प्रमुख आव्हान आहे. त्यासाठी काँक्रीट व स्टीलला पर्याय देणे गरजेचे आहे. ग्रीन कॉंक्रीट, पेपरक्रिट सारखे नवीन पर्याय सुचवणे व वापरणे गरजेचे आहे. सध्या फायबर रेनफोर्सड पॉलीमर बार्स हा नवीन पर्याय सध्या वापरात असलेल्या रेनफोर्सड स्टील साठी सुचवला जात आहे. त्याची स्ट्रेंग्थ खूपच चांगली आहे, परंतु ते ज्वालाग्रही आहे. त्यासाठी आरसीसी स्ट्रक्चर मधील कॉन्क्रीट मध्ये जास्त कव्हर ठेवणे हा एक उपाय आहे.’
पाहुण्यांची ओळख डॉ. पी. पी. फडणीस यांनी करून दिली. महेश साळुंखे यांनी आभार मानले. व्ही. के. कांबळे, वाय्.एस्. व्हटकर, ए. आर.रेणाविकर उपस्थित होते. अधिविभागाचे संचालक डॉ. एस. एम. सपली यांचे प्रोत्साहन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96541 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..