सकाळ प्रॉपर्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ प्रॉपर्टी
सकाळ प्रॉपर्टी

सकाळ प्रॉपर्टी

sakal_logo
By

सकाळ वास्तू एक्‍स्पोचे
१ ऑक्टोबरपासून आयोजन
एकाच छताखाली शंभरहून अधिक प्रकल्पांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याला स्वप्नातील घर घेण्याची संधी गुरुप्रसाद डेव्हलपर्स ॲण्ड बिल्डर्स प्रस्तुत ‘सकाळ वास्तू एक्स्पो २०२२’ च्या माध्यमातून आयोजन केले आहे. १ ते ३ ऑक्टोबर दरम्यान बसंत-बहार चित्रपट गृहाशेजारील हॉटेल पॅव्हेलीयन परिसरातील मधुसूदन हॉल येथे सकाळी दहा ते रात्री आठ दरम्यान हे प्रदर्शन भरणार आहे, ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे ही संधी उपलब्ध केली आहे. बदलत्या जीवनशैलीला पूरक अशा सुमारे शंभराहून अधिक प्रकल्पांची माहिती येथे एकाच छताखाली पाहण्यास मिळणार आहे. प्रवेश आणि पार्किंग सर्वांसाठी मोफत आहे.

‘घर असावे घरा सारखे...’याची प्रचिती घेण्यासाठी ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘सकाळ वास्तू एक्स्पो २०२२’ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. व्यवसायातील उत्तुंग यश मिळविण्यासाठी व्यावसायिकांनाही मोठी संधी आहे. प्रदर्शनात एक, दोन आणि तीन बीएचके फ्लॅटची माहिती या प्रदर्शनात मिळणार आहे. सुमारे शंभराहून अधिक प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली असणार आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवसांत स्वप्नातील घर सत्यात उतरण्याची संधी, यानिमित्ताने मिळणार आहे. फ्लॅटसोबतच प्रीमियम घर, बंगलो, कमर्शियल प्रॉपर्टीज यासह वास्तूशी संबंधित अन्य माहितीही या प्रदर्शनातून मिळणार आहे. व्यावसायिकांना अनेक ग्राहकांसमोर प्रकल्पांची माहिती देता येणार आहे. आवश्‍यक अर्थसाहाय्याचीही व्यवस्था प्रदर्शनात आहे. येथे ग्राहकांसाठी अनेक योजनांची माहिती दिली जाणार असून, त्याचा फायदाही ग्राहकांना होणार आहे. याचबरोबर अनेक गृह प्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्यास मदत होणार आहे. शहरासह बदलत्या बांधकाम क्षेत्राचे नेमके चित्र वास्तू प्रदर्शनात पाहण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96609 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..