आरोग्य भरतीची प्रक्रिया ''नव्याने'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य भरतीची प्रक्रिया ''नव्याने''
आरोग्य भरतीची प्रक्रिया ''नव्याने''

आरोग्य भरतीची प्रक्रिया ''नव्याने''

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...


आरोग्य भरतीची प्रक्रिया ‘नव्याने’
जिल्‍हा निवड मंडळास अधिकार; वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांचे काय?
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १६ : तीन वर्षांनंतर आरोग्य विभागाच्या नोकर भरतीला पुन्‍हा खो घातला आहे. तीन वर्षांनंतर परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर केले होते. त्यामुळे परीक्षार्थी आणि पालकांमधून समाधान व्यक्‍त होत असतानाच पुन्‍हा एकदा ही परीक्षा रद्द करून ही प्रक्रिया नव्याने राबवली जाणार आहे. यामध्ये परीक्षार्थींना नव्याने अर्ज करावे लागणार आहे. मात्र २०१९ मध्ये पात्र व आता वयोमर्यादा ओलांडलेल्या परीक्षार्थींचे होणार काय? असा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. २०१९ मध्ये भरलेल्या परीक्षा शुल्‍काचा विषयही ऐरणीवर येणार आहे.
आरोग्य विभागातील रिक्‍त जागांसाठी २०१९ मध्ये नोकर भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षार्थींनी अर्जही भरले. अभ्यासही केला. मात्र परीक्षा प्रक्रियेत गोंधळ झाल्याने ऐनवेळी ही परीक्षा रद्द कली. तीन वर्षांत भरतीबाबत काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे परीक्षार्थीही विसरून गेले. मात्र अचानक पंधरा दिवसांपूर्वी ग्रामविकास विभागाने ही नोकर भरती करण्याचे जाहीर केले. त्यानुसार परीक्षेचे वेळापत्रकही प्रसिद्ध केले.
परीक्षार्थींनी तयारी सुरू केली असतानाच दोन दिवसांपूर्वी मंत्रालयातून जिल्‍ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये आरोग्य भरतीची प्रक्रिया नव्याने सुरू होणार असल्याचे सूतोवाच केले. सर्वच उमेदवारांना नव्याने अर्ज करावे लागणार असल्याचेही स्‍पष्‍ट केले.

अनेक प्रश्‍न अनुत्तरित

२०१९ मध्ये ज्यांनी अर्ज भरला त्यांच्या फीचे काय?
वयोमर्यादा ओलांडलेल्यांना संधी मिळणार का?
एकाचवेळी परीक्षा असल्याने इतर जिल्‍ह्यात अर्ज भरता येणार का?
एकाचवेळी अनेक पदांसाठी परीक्षा देता येणार का?

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96614 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..