स्वच्छता ही सेवा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छता ही सेवा!
स्वच्छता ही सेवा!

स्वच्छता ही सेवा!

sakal_logo
By

ग्रामस्तरावर २ ऑक्टोबरपर्यंत
स्वच्छता ही सेवा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : शासनातर्फे स्वच्छता ही सेवा अभियान हाती घेतले आहे. या अभियान अंतर्गत ग्रामस्तरावर विविध उपक्रम हाती घेतले आहेत. गावांची दृश्य स्वच्छता या विषयावर आधारित उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात २ ऑक्टोबरपर्यंत हे अभियान चालणार आहे.
गावांची स्वच्छता डोळ्यासमोर ठेऊन या अभियानाची मांडणी केली आहे. या अंतर्गत प्रबोधनासाठी प्रभात फेरी, कचरा न करण्यासाठी घोषवाक्य लेखन, प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामाबाबत बैठका, प्लास्टिक संकलन केंद्र सुरू करणे, सुका व ओला कचरा वेगळा करण्याबाबत जनजागृती, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्राच्या ठिकाणी स्वच्छता करणे, पाणवठ्याजवळील परिसर स्वच्छ करुन सभोवताली वृक्षारोपण करणे आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.
ग्रामस्तरावर या उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांची तसेच संनियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, स्वच्छता ही सेवा या अभियान अंतर्गत उद्या (ता. १७) महाश्रमदान मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेसाठी गडहिंग्लज तालुक्यातील जरळी व इंचनाळ या दोन गावांची निवड केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96636 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..