रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी ठोस पावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी ठोस पावले
रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी ठोस पावले

रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी ठोस पावले

sakal_logo
By

लोगो ः आयजीएम आधुनिकतेच्या मार्गावर ः भाग चार
---------------
50452
---------------
रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी ठोस पावले
चार कोटी ४० लाखांची अत्याधुनिक अग्निशामक यंत्रणा होणार कार्यन्वित

संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १६ : आयजीएम रुग्णालय अत्याधुनिककडे मार्गक्रमण करीत आहे. त्यासोबत रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी ही ठोस पावले उचलण्यात येत आहेत. आगीसारख्या दुर्घटनेपासून सुरक्षतेसाठी ४ कोटी ४० लाखांची अत्याधुनिक अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. त्यामध्ये १५ मीटरवर फायर सिलिंडर बसवणे, ३० मीटर अंतरावर, जिन्यामध्ये डाउन कमर सिस्टिम बसवणे, प्रत्येक मजल्यावर हायड्रट व्हाल, होज पाईप, होज बॉक्स, स्मोक डिटेक्टर, स्पिंक्लर यासह अन्य उपकरणांच्या माध्यमातून सक्षम अग्निशामक यंत्रणा होणार आहे. त्यासाठी एक लाख लिटर पाण्याची टाकी अंडरग्राऊंड उभारली आहे. त्यामुळे रुग्णालयात शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणाने लागलेल्या आगीवर वेळीच नियंत्रणात आणता येणार असल्याने दुर्घटना टाळण्यास मदत होणार आहे.
इचलकरंजी शहरातील आयजीएम रुग्णालय कोरोनात हातकणंगले, शिरोळ तालुक्यासह कर्नाटक भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी संजीवनी ठरले आहे. अनेक रुग्णांनी रुग्णालयात मिळालेल्या योग्य उपचारामुळे कोरोनावर यशस्वी मात केली. यावेळी कोरोना रुग्णांनी रुग्णालय भरले असताना आगीच्या, ऑक्सिजन गळतीच्या घटना घडल्या होत्या. रुग्णालयात सक्षम अग्निशामक यंत्रणा उपलब्ध नसल्याने पालिकेच्या अग्निशामक दलाची प्रतीक्षा करावी लागली होती. या कालावधीत रुग्णांच्या सोबत कर्मचाऱ्यांमधून भीतीने गोंधळ उडाला होता. सुदैवाने या घटनांमध्ये जीवित हानी झाली नसली तरी रुग्णालयाचा सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. त्यांनातर रुग्णालय प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयाकडे वेळोवेळी प्रस्ताव पाठवून सक्षम अग्निशामक यंत्रणेची मागणी केली होती.
सध्या रुग्णालय कार्यान्वित करण्यात येणारी अग्निशामक यंत्रणा ही अत्याधुनिक असून स्मोक डिटेक्टरमुळे आग प्रथम स्वरुपात असतानाच स्वयंचलित स्पिंक्लरच्या माध्यमातून आटोक्यात आणता येणार आहे. यासोबत इलेक्ट्रिक, ऑईलसारख्या आगीसाठी अग्निशामक सिलिंडर असणार आहेत. त्यामुळे आग रुद्रावतार धारण करण्याआधी नियंत्रणात आणण्यात मदत होणार आहे. रुग्णालयाच्या मागील बाजूस एक लाख लिटरची पाण्याची टाकी तयार केली आहे. एकंदरीत रुग्णालय सर्व बाजूंनी सक्षम होताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यात सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक कारणाने उपचाराविना होणारी परवड थांबणार आहे.
(समाप्त)
-------------

आयजीएममध्ये घडलेल्या आगीच्या घटनांवर दृष्टिक्षेप
मे २०२१* हायफ्लो मशिन आग
ऑगस्ट २०२१* इलेक्ट्रिक बॉक्स आग
सप्टेंबर २०२१* ऑक्सिजन लाईन गळती
------------
याआधी दोन वेळा फायर ऑडिट
सीपीआरच्या ट्रामा केअर सेंटरला आग लागल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आदेश जारी करून शासकीय रुग्णालयातील फायर ऑडिट केले होते. समितीने २०२० मध्ये आयजीएम रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी झालेल्या ऑडिटनुसार अंदाजपत्रकात अग्निरोधक कामांसाठी ४ कोटी ८० लाख खर्चाची नोंद केली होती. पुन्हा १६ एप्रिल २०२१ रोजी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन फायर ऑडिट केले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96654 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..