बालक प्रकृतीवाढीचा तक्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालक प्रकृतीवाढीचा तक्ता
बालक प्रकृतीवाढीचा तक्ता

बालक प्रकृतीवाढीचा तक्ता

sakal_logo
By

50533

बाळाच्या तंदुरूस्तीसाठी भरा तक्ता
जिल्‍ह्यात ६० टक्क्यांहून अधिक पालक करताहेत दुर्लक्ष

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १६ ः बाळ जन्माला आल्यानंतर पुढील वाढ अधिक तंदुरूस्तपणे व्हावी, त्याला कोणता आजार असल्यास वेळीच चाचणी, निदान व उपचार करून त्याची प्रकृती धडधाकट करता यावी, यासाठी उपयुक्त ठरणारा बाळाच्या प्रकृती वाढीचा तक्ता शासनाने प्रत्येक बाळाच्या पालकांना दिला आहे. मात्र, ६० टक्क्यांहून अधिक बाळाचे पालक तक्ता भरत नाहीत. परिणामी, बाळांचे गंभीर आजार वेळीच शोधून त्याच्यावर उपचार करणे मुश्कील होते.

काही बाळांचे आजार गंभीर झाल्यानंतर उपचाराला आणले जाते. तक्ता भरण्यातील दुर्लक्ष बाळाच्या जगण्यावर विपरित परिणाम करते. त्यामुळे तक्ता भरण्याच्या सुविधेची पडताळणी गांभीर्याने होण्याची गरज आहे.

बाळाचा जन्म झालेल्या दवाखान्यात बाळाची प्रकृती नोंदविण्याचा तक्ता दिला जातो. त्यात बाळाचे वजन, उंची व डोक्याचा घेर याची माहिती दर सहा महिन्याला वयाच्या १८ वर्षांपर्यंत भरावी लागते. ग्रामीण भागात अशी नोंदी अंगणवाडी सेवकांकडून होतात. मात्र, अनेकदा बाळाचे कुटुंब बदली होऊन इतरत्र गेले. पत्ता बदलला किंवा दोन वेळा जाऊनही बाळ, पालक भेटलेच नाहीत अशा अनेक कारणांनी तक्ता भरण्यात अडचणी येतात.
शहरात बाळाला अंगणवाडीत इंग्लिश मीडियममध्ये घातल्याने तिथे अशा नोंदी घेतल्या जातीलच असे नाही. तर काही भागात अंगणवाडी सेवकांना घरातच येऊ दिले जात नाही. जिल्ह्यात १ महिना ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांची संख्या दीड लाख आहे.

कोट
बाळाची खुंटलेली वाढ पालकांच्या लक्षात येत नाही. भविष्यात आजाराची लक्षणे तीव्र होतात तेव्हा बाळाला दीर्घ उपचार किंवा शस्त्रक्रियेलाच सामोरे जावे लागते. बाळाच्या प्रकृतीचा तक्ता नियमित भरल्यास बाळाच्या आजारांचा शोध वेळीच घेणे, उपचार करणे शक्य होते.
- डॉ. शिशिर मिरंगुडे, बालरोग तज्ज्ञ

चार्ट करावा
तक्ता भरण्याचे प्रमाण
१ ते २ वर्षांपर्यंत - ४० टक्के
२ ते ३ वर्षे - ५० टक्के
३ ते ४ वर्षे - ३५ टक्के
४ ते ५ वर्षे - २५ टक्के
५ वर्षांपेक्षा अधिक - ० ते ७ टक्के

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96687 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..