सर्कीट बेंच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्कीट बेंच
सर्कीट बेंच

सर्कीट बेंच

sakal_logo
By

50591

सर्किट बेंचबाबत मुख्यमंत्र्याकडे
आग्रही भूमिका मांडणार : माने

खंडपीठ कृती समितीने घेतली भेट

कोल्हापूर, ता. १६ ः सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू व्हावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आग्रही भूमिका मांडणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले खंडपीठ कृती समितीने त्यांची रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी भेट घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
खासदार माने यांनी सहा जिल्ह्याचा कोल्हापूर सर्किट बेंच प्रश्न हा सहा जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. या विषयी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे सांगितले. या शिष्टमंडळात जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके, सचिव ॲड. विजयकुमार ताटे- देशमुख, ॲड. संदीप चौगुले, माजी अध्यक्ष ॲड. संपतराव पवार, इचलकरंजी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. विश्वासराव चुडमुंगे यांचा समावेश होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96703 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..