बसर्गे हायस्कूलचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बसर्गे हायस्कूलचे यश
बसर्गे हायस्कूलचे यश

बसर्गे हायस्कूलचे यश

sakal_logo
By

बसर्गे हायस्कूलचे यश
दुगूनवाडी : बसर्गे (ता.गडहिंग्लज) येथील एस. एम. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आठवीसाठी घेतलेल्या एन. एम. एम. एस. परीक्षेत यश मिळवले. अनुज गडकरी याने नॅशनल मेरिट स्कॉलरशिप राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. परीक्षेसाठी सारथीमार्फत मिळणाऱ्‍या शिष्यवृत्तीसाठी हायस्कूलमधील गौरी शिंदे, दीक्षा भुईंबर, नम्रता कदम, मनोज चौगुले, शुभम माने या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. बसर्गे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, संचालक यांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापक आनंदा वाघराळकर व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.
----------------------------------------------
एस. एम. हायस्कूलमध्ये कार्यक्रम
दुगूनवाडी : बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील एस. एम. हायस्कूलमध्ये हिंदी दिन साजरा झाला. प्रतिमेचे पूजन श्री. हिरेमठ व श्री. घुले यांनी केले. हिंदी शिक्षक ए. बी. नंद्यानावर व एस. बी. पाटील यांची भाषणे झाली. आदर्श व्यक्तिरेखा प्रकटीकरण, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आनंदा वाघराळकर होते. पूजा हसुरकर व सृष्टी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सुनील रेडेकर यांनी आभार मानले.
---------------------------------------------
मुगळीत समूहगीतांचे सादरीकरण
नूल : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हिंदी दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. मुख्याध्यापिका सौ. लोहार यांच्याहस्ते प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. सौ कंदगल यांनी प्रास्ताविकात हिंदी दिनाचे महत्व सांगितले. पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी नाटिका, कविता व समूहगीत सादर केले. योगेश धनवडे यांनी सूत्रसंचालन केले. श्रवण शिडलाळे यांनी आभार मानले. यावेळी एस. बी. कांबळे, एम.डी. रणनवरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
-----------------------------------------------------
हलकर्णीमध्ये पुस्तक वाचन
नूल : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील हलकर्णी भाग हायस्कूलमध्ये हिंदी दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक आर. एस. पाटील यांनी केले. वैष्णवी बोनी, स्नेहा धनगर, सन्हेल पाटील व प्रियांका कोरे यांनी हिंदी भाषेचे महत्व स्पष्ट केले. अक्षरा भुईबर, नेत्रा बोळगेवी व स्नेहा काळे यांनी हिंदी साहित्यकांची माहिती सांगितली. ग्रंथालयात हिंदी पुस्तक वाचन उपक्रम राबविण्यात आला. आलिया मालदार, गुंजन गोकावी, संध्या चौगुले, पृथ्वीराज कडुकर, पवन पाटील, मल्लेश चौगुले, सोमेश पाटील यांच्या गटाने हिंदी भाषेतून घोषणा दिल्या. सौ. स्वाती पोतदार, आर.एल.पाटील, एम.आर. व्हसकोटी यांनी संयोजन केले. सोनिया संगाज यांनी सूत्रसंचालन केले. के. बी. पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96706 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..