मोक्ष प्राप्तीसाठी भगवंताची भक्ती करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोक्ष प्राप्तीसाठी भगवंताची भक्ती करा
मोक्ष प्राप्तीसाठी भगवंताची भक्ती करा

मोक्ष प्राप्तीसाठी भगवंताची भक्ती करा

sakal_logo
By

50494
-------------------------------------------
मोक्ष प्राप्तीसाठी भगवंताची भक्ती करा
गुरुसिद्धेश्वर महास्वामी : नूलमध्ये शिवपुराण प्रवचनाची सांगता
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. १६ : आपल्या जीवनात सर्व प्रकारचे सुख-दुःखाचे भोग भोगून जीवनाच्या अंतिम क्षणी पुन्हा पुनर्जन्म नको असल्यास मोक्ष प्राप्तीसाठी सद्‍गुरूंची सेवा करून भगवंताची भक्ती करावी, असे उद्‍गार सुरगीश्वर मठाचे मठाधिपती श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी काढले.
येथील महालक्ष्मी मंदिरात श्री शिव पुराण प्रवचन समाप्ती समारंभात ते बोलत होते. जगाच्या कल्याणासाठी ईष्ठलिंग महाभिषेक केला. अविनाश देसाई व त्यांच्या पत्नी सौ. उमा देसाई यांच्याहस्ते स्वामीजींची पाद्यपूजा केली. प्रवचनकार गुरुप्रसाद गुरव व त्यांच्या पत्नी वंदना गुरव, कल्लाप्पाण्णा देसाई, पुजारी भीमगोंडा देसाई यांचा वस्त्रअलंकार देऊन सत्कार केला.
कार्तिक स्वामी, अजित स्वामी, मारुती नाईकवाडी, कुमार देसाई, रमेश देसाई, मारुती शेगुणशी, विनोद नाईकवाडी, भीमाप्पा मास्तोळी, बसगोंडा पाटील, अनिल देसाई, महांतेश देसाई, रामगोंडा पाटील, मारुती देसाई, मल्लिकार्जुन कोटबागी, शंकर गुरव, पुंडलिक देसाई, केंप्पाना देसाई, रामू देसाई, सुरेंद्र देसाई, भीमगोंडा देसाई, ईश्वर माने उपस्थित होते. शिवानंद देसाई यांनी आभार मानले. महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96708 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..