१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१

sakal_logo
By

मत-मतांतरे

पर्यावरणाबाबतची उदासीनता
देशात प्रदूषण आणि पर्यावरणाबाबत उदासीनताच दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्यही त्याला अपवाद नाही. राज्यात असणाऱ्या घन व द्रव कचरा व्यवस्थापनाबाबत राज्याने सजगता दाखवलेली नाही. प्रदूषणाचे नियमही धाब्यावर बसविल्याचे दिसते. या दोन्ही बाबींसाठी राष्ट्रीय हरित लवादाने राज्याला बारा हजार कोटींचा दंड केला आहे. राज्यात कोणाचेही सरकार येवो, प्रदूषण रोखण्यासाठी, पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी केवळ आश्वासने व कागदी घोडे नाचविण्यापलीकडे कुणीही काहीही केलेले नाही. लवादाने ठोठावलेल्या दंड रकमेत एखादी विकास योजना साकारली असती. निदान आता एवढा दंड बसल्यावर तरी प्रशासन शहाणे व्हायला हवे.
श्रीधर वष्ट, कोल्हापूर

‘स्टार्ट अप’ची बिकट वाट
भारतात ‘स्टार्ट अप’पुढे अडचणी उभ्या राहिल्या आहेत. खरे तर २०२१ हे वर्ष ‘स्टार्ट अप’वाढीच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरले होते. या वर्षात ‘स्टार्ट अप’मध्ये विक्रमी गुंतवणूक झाली होती. विशेष म्हणजे ४२ ‘युर्नलॉर्न’ कंपन्या उदयास आल्या. त्यानंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे मात्र भारतीय ‘स्टार्ट अप’ला धक्का बसला. वाढती महागाई, व्याजदरामुळे गुंतवणूकदारांनी हात आखडते घेतले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत काही हजार कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या. ‘स्टार्ट अप’साठी २०२२ च्या सुरुवातीपासूनच ओघ कमी होऊ लागला आहे. मूल्यांकनातही ३८ टक्क्यांची घट दिसली. एप्रिल २०२२ मध्ये एकही ‘स्टार्ट अप’ युनिकॉर्न स्तराला पोचलेले नाही. रुपयाची घसरण सुरूच आहे. आयात वाढत असून, निर्यातीत घट होताना दिसते. रोजगार कमी होत आहेत. रोजगार संधीही कमी होताना दिसतात. या साऱ्या चक्रव्युहात ‘स्टार्ट अप’ची वाटचाल बिकट बनली आहे. सरकारने यात लक्ष घालून त्यांना सहाय्य करणे आवश्‍यक आहे.
प्रा. डॉ. गिरीश नाईक, कोल्हापूर

पगाराचे नियोजन हवे
आपण आपल्या देशाचे वा राज्याचे अंदाजपत्रक वाचतो. पण, आपल्या मासिक पगाराचे अंदाजपत्रक करायला विसरतो. पगार हाती आल्यावर त्यातून काय करावे व काय करू नये, याची यादी केली पाहिजे. काही वेळा आपल्या इच्छा मागे पडलेल्या असतात. त्यांना अगोदर प्राधान्य दिले पाहिजे. कधी एखादे पुस्तक खरेदी करायचे असते, कधी एखादी पार्टी करायची असते... अशा इच्छांची यादी करून हाती येणाऱ्या पगाराचे काटेकोर नियोजन करता येते. गरजा, इच्छा व बचत याचे संतुलन साधून खर्च केल्यास महिन्याचा पगार ३० दिवसांचे आयुष्य निश्‍चितपणे गाठू शकतो. उसनवारी हा प्रकार टाळून आपली आर्थिक स्थिती काबूत ठेवता येते.
रावसाहेब शिरोळे, रुकडी (जि. कोल्हापूर)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96746 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..