गड-प्राध्यापकाचा रस्त्यावर सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-प्राध्यापकाचा रस्त्यावर सत्कार
गड-प्राध्यापकाचा रस्त्यावर सत्कार

गड-प्राध्यापकाचा रस्त्यावर सत्कार

sakal_logo
By

50527
------------------------------
निवृत्त प्राध्यापकांचा रस्त्यावर सत्कार
सभागृह न दिल्याचा परिणाम : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतील वाद चव्हाट्यावर
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ : येथील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेत काही दिवसांपासून सुरू असलेला अंतर्गत वाद आज चव्हाट्यावर आला. त्याला निमित्त ठरले ते प्राध्यापकांच्या निवृत्ती समारंभाचे. संघटनेच्या एका गटाने सभागृह न दिल्यामुळे चक्क रस्त्यावरच कार्यक्रम घेत त्यांचा सत्कार केला. हा विषय शैक्षणिक क्षेत्रात चर्चेचा ठरला आहे.
येथील कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेत दोन गट पडले आहेत. एका गटाचे अध्यक्ष मधुकर शिंदे आहेत. ते नुकतेच येथील गडहिंग्लज कनिष्ठ महाविद्यालयातून निवृत्त झाले आहेत. त्याबद्दल त्यांचा आज सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. संघटनेच्या शारदा भवनमध्ये कार्यक्रम होणार होता. पण, संघटनेच्या दुसऱ्या गटाच्या सचिवांनी सभागृह देण्यास नकार दिला. त्यामुळे या गटाने चक्क रस्त्यावरच सत्काराचा कार्यक्रम घेतला. शारदा भवनच्या प्रवेशद्वाराला फलक लावला. प्रवेशद्वारासमोर रस्त्यावरच कार्यक्रम घेतला.
जिल्हा कोषाध्यक्ष शिवाजी होडगे म्हणाले, ‘कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची शारदा भवन ही इमारत आहे. शिक्षकांच्या त्यागातून ही इमारत उभारली आहे. येथे लग्न, मुंज, बारसे, डोहाळे जेवणाचे कार्यक्रम होतात. मग सहकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमाला विरोध का, हा प्रश्न आहे.’ पी. आर. शिंदे यांनी स्वागत केले. अनिता चौगुले, बी. के. मडीवाळे, अरविंद सावंत, श्री. डोणपे यांचीही भाषणे झाली. एन. ए. नांदवडेकर यांनी सूत्रसंचालन केले. आय. पी. कुटीन्हो यांनी आभार मानले.
-----------------
...तर दारात बसून हिशेब विचारू
जिल्हा सचिव संजय मोरे म्हणाले, ‘सचिवांनी २०१२ नंतरचा हिशेब दिलेला नाही. जिल्हा संघटनेच्या ठेवीच्या रक्कमा किती आहे हे कुणालाही माहीत नाही. बुद्धीजीवी वर्गाची संघटना असताना हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे. त्यांच्या दारात बसून हिशेब विचारू.’ तर शिवाजी होडगे यांनी दुभती गाय असल्याने ती सोडायला होत नसल्याचा आरोप केला.
--------
आमची संघटना रीतसर
दरम्यान, संघटनेच्या परीक्षा समितीचे सचिव पी. बी. रक्ताडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘आमची संघटना रीतसर आहे. त्यांची संघटना नोंदणीकृत नाही. कोल्हापूर येथील कार्यालयाची जागा त्यांच्याकडून आम्हाला बैठकीसाठीसुद्धा दिली जात नाही. त्यामुळे आम्हीही सभागृह देण्यास नकार दिला. शिवाय सुरुवातीला गडहिंग्लज तालुक्यातील संघटनेतर्फे सत्कार असल्याचे सांगितले होते; पण जिल्ह्यातील लोकांना बोलावून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे समजल्याने सभागृह दिले नाही.’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96754 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..