यामिनी प्रदर्शन उदघाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यामिनी प्रदर्शन उदघाटन
यामिनी प्रदर्शन उदघाटन

यामिनी प्रदर्शन उदघाटन

sakal_logo
By

50531

कोल्हापूरला पुढे नेणारे यामिनी प्रदर्शन
सतेज पाटील ः रोटरी क्लब ऑफ गार्गीज आयोजित यामिनी प्रदर्शनाचे उद्‌घाटन

कोल्हापूर, ता. १७ ः यामिनीसारखे प्रदर्शन हे कोल्हापूरला पुढे घेऊन जाणारे आहे, असे कार्यक्रम होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी केले. रोटरी क्लब ऑफ गार्गीजतर्फे आयोजित हॉटेल पॅव्हेलियनमध्ये ‘यामिनी’ प्रदर्शनाचे उद्‌घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मधुरिमाराजे छत्रपती व व्यंकटेश देशपांडे यांची उपस्थिती होती.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘आपले कोल्हापूर म्हणजे नेमके काय, याची माहिती प्रदर्शनातून मिळणार आहे. उणिवा या सगळ्यांतच असतात, पण आपणच कोल्हापूरला चांगले म्हणणे आवश्यक आहे.’’ संस्थेच्या अध्यक्षा कविता घाटगे यांनी या प्रदर्शनातून मिळणारा निधी हा सामाजिक कार्यासाठी वापरणार असल्याचे सांगितले.
या तीनदिवसीय प्रदर्शनात ९३ हून अधिक विविध वस्तूंचे विक्रीसाठी स्टॉल्स आहेत. फॅशन आणि लाईफ स्टाइलशी निगडित वस्तू, महिला व लहान मुलांचे कपडे, चप्पल, ज्वेलरी, होम डेकोर, नर्सरी यांच्याबरोबर अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इचलकरंजी, गोवा, दिल्ली, मुंबई, पुणे, बेळगाव, रत्नागिरी येथून स्टॉलधारक सहभागी झाले आहेत. प्रदर्शनास भेट देणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ असणार आहे. प्रसिद्ध सिने कलाकार राज हंचनाळे आणि प्रतीक्षा शिवणकर या प्रदर्शनास भेट देणार आहेत.
यावेळी सचिव प्रीती मर्दा, खजनीस डॉ. गीता पिल्लाई, प्रीती मंत्री, संजय साळोखे, मौसमी आवाडे, आरती पवार, विशाखा आपटे, शोभा तावडे, योगिनी कुलकर्णी, सुजाता लोहिया, अंजली मोहिते, मेघना शेळके, सुरेखा इंगरोळे, सविता पदे, आशा जैन, रेणुका सप्रे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96761 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..