खाजगी प्राथमिक शिक्षक निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खाजगी प्राथमिक शिक्षक निवेदन
खाजगी प्राथमिक शिक्षक निवेदन

खाजगी प्राथमिक शिक्षक निवेदन

sakal_logo
By

50546

खासगी प्राथमिक शिक्षकांच्या
प्रलंबित मागण्या सोडवण्यास प्राधान्य

पालकर ः पुण्यातील बैठकीत संघटना प्रतिनिधींना ग्वाही

कोल्हापूर, ता. १६ ः राज्यातील खासगी प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या प्राधान्यक्रमाने सोडवल्या जातील, अशी ग्वाही शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली. खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची पुण्यात बैठक झाली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. अध्यक्षस्थानी आमदार प्रा. जयंत आसगांवकर होते. कोल्हापूर विभागाचे उपसंचालक महेश चोथे, पुणे विभागाचे उपसंचालक औदुंबर उकिर्डे, उपसंचालक वंदना वाहूळ, उपसंचालक दीपक चवळे, शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे आदी उपस्थित होते.
आधार कार्ड अपडेट करणेसाठी मुदतवाढ देणे, भविष्य निर्वाह निधी व इतर थकित बिले मिळण्यासाठी कायमस्वरूपी बीडीएस लिंक ओपन ठेवणे, खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांतील ५० हजार रिक्त पदांची भरती करणे, चालू वर्षाची संच मान्यता ३० सप्टेंबरच्या पटावर करून अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे समायोजन तत्काळ करणे, शिक्षण सेवकांचे मानधन पंधरा हजार करणे आदी विषयांवर चर्चा झाली. समितीचे उपाध्यक्ष सारंग पाटील, कार्याध्यक्ष संतोष शिळीमकर, राज्य शिक्षकेतर प्रमुख जी. डी. मोराळे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96790 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..