चित्रपट महामंडळ निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रपट महामंडळ निवडणूक
चित्रपट महामंडळ निवडणूक

चित्रपट महामंडळ निवडणूक

sakal_logo
By

राजेभोसलेंनी निवडणूक लढवावीच
धनाजी यमकर यांचे आव्हान; राजेभोसलेंनी जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम बेकायदेशीर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे बहुमत आमच्या कार्यकारिणीकडे आहे. त्यामुळे मेघराज राजेभोसले यांनी स्वतः अध्यक्ष असल्याचे सांगून जाहीर केलेली महामंडळचा निवडणूक कार्यक्रम बेकायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही बहुमताच्या बळावर चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर करीत आहे. येत्या ३० सप्टेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू करीत आहोत. आम्ही जाहीर केलेली महामंडळाची निवडणूक लढवून दाखवावीच,’’ असे आव्हान अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर व बाळा ऊर्फ रणजित जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले. निवडणुकीसाठी ॲड. के. व्ही. पाटील निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या सोबत पराग भावसार (मुंबई), अशोक सासने (मुंबई), संतोष खापरे (पुणे), आनंद कुलकर्णी व अरुण भोसले (कोल्हापूर) यांची समिती नियुक्ती केल्याचेही यमकर यांनी सांगितले.
श्री. यमकर म्हणाले, ‘‘वास्तविक चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपद मेघराज राजेभोसले यांच्याकडे असताना सभासदांच्या मागणीनुसार वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी, अशी मागणीची लेखीपत्रे दिली होती. त्या पत्रांना त्यांनी केराची टोपली दाखवली. तसेच त्यांच्या मर्जीतील आकाराम पाटील, महेश पन्हाळकर व अन्य सभासदांना घटना माहिती असूनही त्यांच्या कृती समितीने महामंडळावर मोर्चा आणला. गेल्या चार वर्षांच्या काळात चुकीच्या पध्दतीने अर्थिक व्यवहार झाले आहेत. ते सभासदापर्यंत पोहचू नयेत म्हणून त्यांनी सभा घेण्याचे टाळले, किंबहूना ते टाळण्यासाठी त्यांनी निवडणुकीचा घाट घातला.’’
महामंडळाचा ज्या त्या वर्षीचे आर्थिक वर्षांचे ताळेबंद पत्रक, उत्पन्न खर्च पत्रक, आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभे घेऊन त्यात सभासदांची मान्यता घेणे आवश्यक असते. मात्र अशी प्रक्रिया न करताच राजेभोसले यांनी आपल्या मर्जीतील सभासदांचे लेखा परीक्षण अहवालावर सह्या घेऊन तेच धर्मादाय आयुक्त कार्यालय व आयकर विभागाला दिले. ही सभासदांची फसवणूक आहे, असेही श्री. यमकर व श्री जाधव यांनी सांगितले.

निवडणूक कार्यक्रम असा
सभासद कच्ची यादी प्रसिद्धी ३० सप्टेंबर
हरकती मागवणे ३ नोव्हेंबर
पक्की मतदार यादी प्रसिद्ध ६ नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज वाटप १० ते १५ नोव्हेंबर
अर्ज स्वीकारणे १७ व १८ नोव्हेंबर
अर्ज छाननी ः १९ नोव्हेंबर
पात्र उमेदवारांची यादी २१ नोव्हेंबर
अर्ज माघारी २७ व २८ नोव्हेंबर
पात्र उमेदवार यादी प्रसिद्ध २९ नोव्हेंबर
चिन्ह वाटप ३१ नोव्हेंबर
उमेदवार अंतिम यादी ९ नोव्हेंबर
मतदान १३ नोव्हेंबर
मतमोजणी निकाल १५ नोव्हेंबर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96810 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..