स्वच्छता मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छता मोहीम
स्वच्छता मोहीम

स्वच्छता मोहीम

sakal_logo
By

50578
स्वच्छतेत ५ टन कचरा उठाव
कोल्हापूर, ता. १६ : महापालिकेने शहरातील सर्व मुख्य रस्ते, फुटपाथची स्वच्छता मोहीम शुक्रवारी राबविली. यात ५ टन कचरा व गाळ उठाव झाला. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या आदेशानुसार आरोग्य विभागाने १२ वॉर्ड अंतर्गत मोहीम राबविली.
खराडे कॉलेज ते जुना वाशी नाका, इंदिरा सागर ते शासकीय मध्यवर्ती कारागृह, तलवार चौक ते नवीन वाशी नाका, छत्रपती शिवाजी पूल ते गायकवाड पुतळा, चिमासाहेब चौक ते व्‍हिनस कॉर्नर, बिंदू चौक ते दसरा चौक, रंकाळा टॉवर ते शालिनी पॅलेस, शाहू टोल नाका ते केएसबीपी चौक, छत्रपती शाहू मिल चौक ते सायबर चौक, कावळा नाका ते सदर बाजार, धैर्यप्रसाद चौक ते गोल्डन जिम, डीएसपी चौक ते महावीर कॉलेज, डीएसपी चौक ते पितळी गणपती, सर्किट हाऊस ते लाईन बझार, डीएसपी चौक ते भगवा चौक, मार्केट यार्ड ते कावळा नाका ते उड्डाण पूल या परिसरात मोहीम राबविली. १२ ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर करण्यात आला. मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, सर्व आरोग्य निरीक्षक, मुकादम, कर्मचारी सहभागी होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96824 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..