नोंदणी नसणार्‍या हॉस्‍पीलवर होणार कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोंदणी नसणार्‍या हॉस्‍पीलवर होणार कारवाई
नोंदणी नसणार्‍या हॉस्‍पीलवर होणार कारवाई

नोंदणी नसणार्‍या हॉस्‍पीलवर होणार कारवाई

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...

नोंदणी नसणाऱ्या
हॉस्पिटलवर कारवाई
आरोग्य समितीच्या बैठकीत निर्णय
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १६ : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल सुरू आहेत. मात्र यातील अनेकांनी नोंदणी केलेली नाही किंवा परवाना असेल तर त्याचे नूतनीकरण केलेले नाही. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे नोंदणी व नूतनीकरण नसणाऱ्या हॉस्पि‍टलनी जर नोंदणी केली नाहीतर त्यांच्यावर कारवाई करावी, असा ठराव आज जिल्‍हा परिषदेच्या आरोग्य समितीत घेण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्‍हाण यांच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्‍हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे व सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्‍थित होते.
आरोग्य विभागाने सेवा पंधरवडा कालावधी विविध वैद्यकीय कँपचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शून्य ते ६ वर्षे वयोगटातील सर्व मुलामुलींचे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड नोंदणी करण्यासाठी सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांनी गट विकास अधिकारी यांच्याशी समन्वय साधून त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा यांना लेखी सूचना देऊन या बालकांचे आधार कार्ड काढण्याचे नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. ही सर्व प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक आशा, अंगणवाडी सेविका यांनी संशयित कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोधून्य त्यांच्यावर वेळेत उपचार करण्याच्या देण्यात आल्या. तसेच दारिद्र्यरेषेखालील बाळंतीण व बाळ यांचा आरोग्य विभागाने सर्व्हे करून त्याची यादी करावी आणि अशा बाळंतीण व बाळ यांचे डासांपासून संरक्षण करण्यासाठी मॉस्कीटो नेट पुरविणेची नावीण्यपूर्ण योजना घेण्यास मान्यता देण्यात आली.


ऑपरेशन थिएटर सुरू करा
प्राथमिक आरोग्य केंद्रातील ऑपरेशन थिएटर चालू स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जी थिएटर बंद होती त्यांची डागडुजी करून त्याचा तपासणी स्वॅब पाठवून थिएटर चालू करावीत. याबाबतचा अहवाल तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत आरोग्य विभागाकडे सादर करावा, अशा सूचना श्री. चव्‍हाण यांनी केल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96862 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..