इतर देवस्थान प्रमाणेच ई-पास- जिल्‍हाधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इतर देवस्थान प्रमाणेच ई-पास- जिल्‍हाधिकारी
इतर देवस्थान प्रमाणेच ई-पास- जिल्‍हाधिकारी

इतर देवस्थान प्रमाणेच ई-पास- जिल्‍हाधिकारी

sakal_logo
By

५०५७७
स्वच्छतेसह चांदीच्या
दरवाजांचे काम वेगाने
कोल्हापूर, ता. १६ ः नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील स्वच्छतेसह चांदीच्या दरवाजांचे काम वेगाने सुरू झाले आहे. आज गरूड मंडपाची स्वच्छता झाली. आणखी दोन दिवस स्वच्छता मोहीम सुरू राहणार असून त्यानंतर देवीच्या अलंकारांची स्वच्छता होईल.
अंबाबाई मंदिरातील पितळी व गाभाऱ्याच्या ठिकाणचे दरवाजे खराब झाले आहेत. त्यामुळे ते बदलले जाणार आहेत. भाविकांनी दिलेल्या सागवान लाकूड आणि चांदीतून ते तयार करून उत्सवापूर्वी बसवले जाणार आहेत. दर्शन मंडप उभारणीलाही लवकरच प्रारंभ होणार असून आय स्मार्ट फॅसिटेक प्रायव्हेट लिमिटेडतर्फे मंदिराची स्वच्छता सुरू आहे.

‘व्हीआयपी’ नव्हे सर्वांनाच ‘पेड’ ‘ई-पास’
जिल्हाधिकारी रेखावार; अन्य मंदिरांप्रमाणेच ई-पासची सोय; नवरात्रात दिवसाला हजारच पास देणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः तुळजापूर, पंढरपूरसह अन्य देवस्थानमध्येही ई-पास ही सेवा सुरू आहे. त्याच धर्तीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात ही दिवसाला केवळ हजार ई-पास दिले जाणार आहेत. मोफत दर्शन रांगेच्या तुलनेत ही संख्या नगण्य आहे, त्यामुळे ई-पास सेवा सुरूच राहणार आहे. परगावाहून आलेल्या भाविकांसह वेळेचे नियोजन करण्याठी हा ई-पास कोणीही घेऊ शकतो. यासाठी ‘व्हीआयपी’च पाहिजे असे नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.
नवरात्रा उत्सवात दोनशे रुपयांना ई-पास देण्याचे नियोजन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केले आहे. गतवर्षी कोविडमध्ये अशाच ई-पासद्वारे पण मोफत दर्शन सेवा सुरू होती. या वर्षी मोफत दर्शनासह प्रत्येक ई-पाससाठी दोनशे रुपये आकारण्याचाही निर्णय झाला आहे. त्यामुळे या नवरात्री उत्सवात दिवसाला हजार ‘पेड ई-पास’ दिले जाणार आहेत. या निर्णयाला काही प्रमाणात विरोध होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांच्याशी संवाद साधला.
श्री. रेखावार म्हणाले, ‘‘इतर देवस्थानमध्येही पेड पास आहे. काही ठिकाणी केवळ ई-पास आहे. त्याच धर्तीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातसुद्धा नवरात्रीत ई-पास देण्यात येणार आहेत. गतवर्षी प्रमाणेच त्याचे नियोजन असेल. यासाठी ‘आधार’ नंबर द्यावा लागणार आहे. तुळजापूरच्या आई तुळजाभवानी मंदिरात ही कायमस्वरूपी दोनशे रुपयांचा ‘पेड ई-पास’ आहे. पंढरपूरमध्ये ई-पास द्वारेच दर्शन दिले जाते, असे असताना कोल्हापुरात आपण वेगळे काही केले नाही. ई-पास घेण्यासाठी ‘व्हीआयपी’च पाहिजे, अशी कोणतीही अट नाही. परगावाहून येणाऱ्यांना आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी हा ई-पास असेल. तो कोणीही घेऊ शकतो. नवरात्री उत्सवकाळात हजार ही संख्या नगण्य आहे. त्यामुळे मुख्य रांगेत ते भाविक सहज सामावून जातील. ई-पास न घेणाऱ्या भाविकांसाठी मुख्य रांग असणार आहे. यामुळे ‘व्हीआयपी कल्चर’ अपोआपच कमी होईल. हा ई-पास शहरातील नागरिकांसह कोणीही घेऊ शकतो.


‘व्हीआयपीं’साठीची
दर्शन रांग चुकीचीच
गजानन मुनीश्‍वर यांचे देवस्थानला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार व्हीआयपी दर्शन रांग चुकीचीच असून ती केल्यास ते बेकायदेशीर कृत्य ठरणार आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात देवस्थान समितीने दोनशे रुपये आकारून वेगळी व्हीआयपी दर्शन रांग करण्याचा निर्णय झाला आहे. त्याप्रमाणे जर दर्शन रांग केली तर दिवाणी व फौजदारी कारवाई केली जाईल, अशा आशयाचे निवेदन गजानन मुनीश्वर यांनी देवस्थान समितीला दिले आहे.
अंबाबाई मंदिरामध्ये महाराष्ट्र सरकारने देवीच्या दर्शनासाठी कोणत्याही देवस्थानने भाविकांसाठी नियमित रांगेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने दर्शन घेण्यास परवानगी घेण्यात येऊ नये व तशी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊ नये. कोणत्याही मार्गाने रक्कम आकारून दर्शनासाठी प्रवेश देवू नये. दर्शनासाठी पासेस किंवा प्रवेश पत्रिका वितरित करू नये, अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना सात सप्टेंबर २०१० ला जाहीर केल्या होत्या. या मार्गदर्शक सूचना अंमलात आणण्यासाठी रे. क. नं. ७२२-२०१० चा दावा दाखल केला होता. त्या दाव्यामध्ये आपण प्रतिवादी नंबर पाच आहात. न्यायालयाने पंधरा ऑक्टोबर २०१२ ला न्यायालयाने याबाबतचे स्पष्ट आदेश दिले आहेत, असेही निवेदनात म्हट१ले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96868 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..