शिवसेना -विमानतळ -संजय पवार निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना -विमानतळ -संजय पवार निवेदन
शिवसेना -विमानतळ -संजय पवार निवेदन

शिवसेना -विमानतळ -संजय पवार निवेदन

sakal_logo
By

५०५२५

जमिनीच्या मूल्यांकनासाठी समिती नेमा
शिवसेनेची मागणी; विमानतळ विस्तारीकरणप्रश्‍नी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः विमानतळ विस्तारीकरणासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या मूल्यासाठी शासकीय समिती नेमावी, यांसह अन्य मागण्यांचे निवेदन आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शिष्‍टमंडळाचे नेतृत्व करून जमीनधारकांना चुकीचा मोबदला देऊन भीती दाखवून संमत्रीपत्र घेत असल्याचाही आरोप केला.
निवेदनात म्हटले आहे, विमानतळ विस्तारीकरणासाठी जागा संपादित केली पाहिजे, जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे; परंतु कार्यवाही करताना अधिकारी जमीनधारकांना चुकीचा मोबदला देऊन भीती दाखवून संमत्रीपत्र घेण्यासाठी दबाव टाकीत आहेत. यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलेली आहेत, पण ज्या पद्धतीने संपादनाची प्रक्रिया केली जात आहे, ती चुकीची आहे. म्हणून आज मागण्यांचे निवेदन देत आहोत.
शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, पोपट दांगट, हर्षल सुर्वे, राहुल गिरुले, संदीप दळवी, बाबूराव पाटील, विराज शिंदे, विनोद खोत, मंजित माने, दीपाली शिंदे, स्मिता सावंत, अवधूत साळोखे, दिनेश परमार, राजू यादव, बाळासाहेब नलवडे, सचिन नागटीळक प्रती क्षीरसागर, अवदेश करंबे, राहुल माळी, वैभव जाधव यांचा समावेश होता.


प्रमुख मागण्या
शासकीय समिती नेमून मूल्य ठरवावे
खातेदाराला जमिनीचे मूल्य कसे ठरविले हे दाखवावे
आवश्‍यक ते कायदे, परिपत्रकाचा संदर्भ द्यावा
बिगरशेती प्लॉटच्या रेडिरेकनरच्या पाचपट गृहीत धरून मिळावा
वस्तीचे सर्वसोयीनियुक्त पुनर्वसन करावे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96869 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..