भारतीय मजदूर संघ निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय मजदूर संघ निवेदन
भारतीय मजदूर संघ निवेदन

भारतीय मजदूर संघ निवेदन

sakal_logo
By

५०५२६

राज्यात वेतन कोड लागू करा
---
मजदूर संघाची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, घोषणाबाजी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः राज्यात वेतन कोड २०१९ लागू करावा, यासह अन्य मागण्यांसाठी आज भारतीय मजदूर संघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दसरा चौकातून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यावर घोषणाबाजी केली. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्‍हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना देण्यात आले. जिल्हाध्यक्ष एस. एन. पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
संघाच्या कार्यकारिणीत ठरल्यानुसार आज एकाच दिवशी कामगारांच्या प्रश्‍नसंबंधी प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आज जिल्हा शाखेतर्फे मोर्चा काढण्यात आला. दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, ॲसेंब्ली रोडमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यानंतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात ‘हम सब एक है’, ‘कामगार एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणा देत मोर्चातील पदाधिकाऱ्यांनी रिमझिम पावसात मोर्चाला मार्गदर्शन केले.
निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्र वेतन कोड २०१९ त्वरित लागू करावा, राज्यात सामाजिक सुरक्षा कोड २०२० त्वरित लागू करावा, घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ कामकाज सुरू करावे, राज्यातील अंगणवाडी व आशा वर्कर्स यांना किमान वेतन लागू करावे, ‘ईएसआय’च्या सुविधेची अंमलबजावणी करावी, कंत्राटी कामगारांनाही किमान वेतन लागू करावे, बांधकाम कामगारांच्या प्रलंबित आर्थिक लाभांची पूर्तता करावी, तसेच नोंदणी व लाभवाटप पारदर्शक व्हावे, ई-श्रम नोंदणी अभियान राबवावे.
शिष्टमंडळात अध्यक्ष एस. एन. पाटील, कार्याध्यक्ष शिवाजी चौगुले, अनुजा धरणगावकर, अमृत लोहार, दादासाहेब पाटील, तेजय मडिवाल, दिलीप मेडसिंगे, रवींद्र एडके, राहुल भालकर यांच्यासह पदाधिकारी यांचा समावेश होता. मोर्चात मुकुंद जोशी, भगवान खाडे, अरुण नागराळे, संदीप पाटील, रमेश थोरात, विद्रुला पाटील, युनूस शेख, प्रशांत कांबळे, दासासो पाटील, सौ. शास्त्री, अणर लोहार आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96896 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..