मगदूम हायस्कूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मगदूम हायस्कूल
मगदूम हायस्कूल

मगदूम हायस्कूल

sakal_logo
By

50610
कोल्हापूर ः हिंदी दिन समारंभात बोलताना मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद. शेजारी अन्य.

हिंदी भाषा राष्ट्रीय प्रतीक
ठरावीः बसवराज वस्त्रद

कोल्हापूर: ''हिंदी भारतातील एक प्रमुख संपर्क भाषा असून, ती शिकण्यासही सोपी आहे .हिंदी भाषेत अनमोल आणि दर्जेदार साहित्य आहे. राष्ट्रभाषा ही राष्ट्रीय सन्मानाचे प्रतीक असते. हिंदी भाषा राष्ट्रीय प्रतीक ठरावी यासाठी सर्वांनी हिंदीचा अंगीकार केला पाहिजे ''असे मत मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद यांनी व्यक्त केले. दादासाहेब अ. मगदूम हायस्कूल आयोजित हिंदी दिन समारंभात ते बोलत होते. आठवीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी ,तेलगू, काश्मिरी ,पंजाबी ,गुजराती ,कन्नड ,बंगाली व इंग्रजी भाषेतील संवाद व प्रांतानुसार वेशभूषेसह बालनाटिका सादर केली. पाचवीच्या विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून विविधतेतून एकतेचा संदेश दिला. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेवती रसाळ उपस्थित होत्या.सांस्कृतिक विभाग प्रमुख महावीर तेरदाळे यांनी प्रास्ताविक केले. संयोजन आणि सूत्रसंचालन शिक्षक दत्ता पालकर यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96914 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..