लाठी पेक्षा संवाद भारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाठी पेक्षा संवाद भारी
लाठी पेक्षा संवाद भारी

लाठी पेक्षा संवाद भारी

sakal_logo
By

लाठीपेक्षा संवादच ठरला लय भारी...
---
पोलिसांचा नवा प्रयोग यशस्वी; गणेश विसर्जन मिरवणुकीत आला सकारात्मक अनुभव
राजेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः पोलिस म्हणजे हातात काठी, करडा आवाज अशी प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. पोलिसांची आदरयुक्त भीती वाटली पाहिजे. पण, सर्वसामान्य व्यक्तीला त्यांचा आधारही वाटला पाहिजे. हे संवादातून साध्य होते, याचा प्रयोग सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत दिसून आला. पोलिसांच्या संवादातून या उत्सवाला कोठेही गालबोट लागले नाही. याठिकाणी ‘लाठीपेक्षा संवाद लई भारी’ हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचा प्रयोग यशस्वी झाला. हाच प्रयोग आता प्रत्येक ठाण्यासह ठिकठिकाणी वापरण्यात येणार आहे, मात्र याला कोणी छेद देण्याचा प्रयत्न केला तर त्याला काठीच दाखविली जणार आहे.
महापूर, कोरोना संकटामुळे तीन वर्षांनंतर यंदाच्या गणेशोत्सवाचे स्वरूप मोठे असणार, याचा अंदाज घेत पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी एक महिना अगोदरच नियोजनास सुरुवात केली होती. ‘सक्ती’ऐवजी ‘संवाद’ हे तंत्र यंदाच्या उत्सवात अधिक प्रवाभीपणे वापरले. पोलिस अधिकाऱ्यांना बैठकीत याबाबतच्या सूचना दिल्या. शहरासह जिल्ह्यातील मंडळांच्या बैठका घेतल्या. त्यांच्या अडचणी व प्रश्न समजून घेतले. त्यांना कायद्याची माहिती देऊन त्याचे उल्लंघन करू नका, असे वारंवार सांगण्यात आले. या संवादातून पोलिसांविषयी असलेली भीती आणि गैरसमज दूर होत गेले. पोलिसही माणूस असून, तोही समाजातील एक घटक आहे. त्यांच्यावर गणेशोत्सवकाळात पडणारा बंदोबस्ताचा मोठा ताण असतो, याची जाणीवही सर्वांना करून दिली. त्यामुळे मंडळातील कार्यकत्यांशी वाद घालण्यापेक्षा त्यांना समजावून सांगण्याला पोलिसांनी प्राधान्य दिले. कार्यकर्त्यांच्या रागाला संवादाने शांत करून, त्यांना विनंती करून समजावल्याने अनेक ठिकाणी होणारे पोलिस विरुद्ध कार्यकर्ते हा वाद कोठेच दिसला नाही.

ठाण्यात सन्मानाची वागणूक
पोलिस ठाण्यात आरोपीव्यतिरिक्त येणाऱ्या सर्वांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. येणाऱ्या प्रत्येकाचे म्हणणे ऐकूण घेतले जाईल. संबंधितांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. विशेष करून पोलिस डायरीला महिला अधिकारी यांची ड्यूटी ठेवून पोलिस ठाण्यात येणाऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले जाईल.याबाबतच्या सूचनाही पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
----------------
उत्सवात साप्ताहिक सुटी ः
गणेशोत्सव काळात त्यांचा बंदोबस्ताचा ताण कमी व्हावा, त्यांना निदान एक दिवस कुटुंबाबरोबर उत्सव साजरा करण्याची संधी मिळावी, यासाठी पोलिसांना साप्ताहिक सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला.


फोटो
गणेशोत्सवात नवीन गोष्टी सुरू करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरकरांनी योग्य संवाद असल्याने त्याला भरभरुन प्रतिसाद दिला. सर्वांचे मनपूर्वक आभार.
- शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक.
------------
उत्सवात पोलिसांना दिलेल्या सूचना...
*कार्यकर्ते, लोकांशी बोलताना संयम ठेवा
*डाव्या हातात काठी ठेवा, हातवाऱ्यांद्वारे होणारा गैरसमज टाळा
*ताणविरहित बंदोबस्त करा
*वादाच्या ठिकाणी संयमाची भूमिका घ्या
*संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा
---------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96931 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..