भडगावमध्ये तिसरे नेत्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भडगावमध्ये तिसरे नेत्रदान
भडगावमध्ये तिसरे नेत्रदान

भडगावमध्ये तिसरे नेत्रदान

sakal_logo
By

50691
शांताबाई आंबी

भडगावमध्ये तिसरे नेत्रदान
गडहिंग्लज, ता. १८ : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील शांताबाई शंकर आंबी (वय ७४) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. भडगावातील हे तिसरे, तर चळवळीतील ७८ वे नेत्रदान ठरले.
शांताबाई आंबी यांचे अल्पशा आजाराने आज दुपारी निधन झाले. तालुक्यात सुरू असलेल्या नेत्रदान चळवळीची माहिती असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शांताबाई यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर येथील अंकुर सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटलच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने भडगाव येथे जाऊन नेत्रगोल घेण्याची प्रक्रिया पार पाडली. आंबी कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत घेतलेल्या या निर्णयाचे समाजातून कौतुक होत आहे. भडगाव गावात चळवळ वाढण्यासाठी त्यांचा कृतिशील निर्णय सहाय्यभूत ठरणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96991 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..