क्षयरोग नियंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षयरोग नियंत्रण
क्षयरोग नियंत्रण

क्षयरोग नियंत्रण

sakal_logo
By

जिल्हा क्षयरोग विभागाचे
‘गोल्ड सबनॅशनल’साठी नामांकन
सर्टिफिकेशनसाठी निवड; ६० टक्के रुग्ण घटल्याने होणार गौरव
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व केंद्रीय क्षयरोग विभागातर्फे पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्हा क्षयरोग विभागाचे ‘गोल्ड सबनॅशनल सर्टिफिकेशन - २०२२’साठी नामांकन झाले आहे. राज्यातून एकमेव जिल्ह्याची निवड झाली. २०२० मध्ये जिल्ह्यास सिल्व्हर सबनॅशनल सर्टिफिकेशन फॉर टीबी एलीनिमेशन मिळाले होते, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी दिली.
२०१५च्या तुलनेने क्षयरुगांच्या संख्येत २० टक्के घट झाल्यास ब्रॉंझपदक व दोन लाख रुपये, ४० टक्के घट झाल्यास रौप्यपदक व तीन लाख रुपये, ६० टक्के घट झाल्यास सुवर्णपदक व ५ लाख रुपये व सबनॅशनल सर्टिफिकेशनसाठी निवड करण्यात येते. या अनुषंगाने प्राथमिक पडताळणी केल्यानंतर पूर्ण राज्यातून कोल्हापूर जिल्ह्यास गोल्ड सबनॅशनल सर्टिफिकेशन फॉर टीबी एलीनिमेशनसाठी नामांकन मिळाले.
कोल्हापूर शहर व ग्रामीण भागाचे एकत्रित गोल्ड नामांकन आहे. यंदाच्या वर्षी राज्यातील पाच जिल्ह्यांना सिल्व्हरपदक व ८ जिल्ह्यांना ब्राँझपदकासाठी नामांकन मिळाले आहे. केंद्रीय क्षयरोग विभाग व राज्यस्तरीय विभाग आणि विविध शासकीय संस्थांद्वारे निवडलेल्या गावांचे सर्वेक्षण, २०१५ ते २०२२ पर्यंतची रुग्ण माहिती व पडताळणी, खासगी क्षयरोग विरोधी औषधे विक्रीची पडताळणी, शासकीय क्षयरोग विरोधी औषधे वितरण विविध मार्गदशक सूचनानुसार अंमलबजावणी यावर आधारित पडताळणी करण्यात येणार आहे. या पडताळणीनंतर २०१५ च्या उद्दिष्ठानुसार ६० टक्के रुग्ण संख्येत घट दिसून आल्यास सुवर्णपदक मिळू शकते. या पुरस्काराचा वितरण सोहळा दिल्ली येथे २४ मार्च २०२३ रोजी होणार आहे.
जिल्हाधिकारी, श्री. राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांचे नामांकनासाठी सहकार्य लाभले. असे ही डॉ. कुंभार यांनी सांगितले.

--------------
२०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्तचे धोरण
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत भारत सरकारने २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचे महत्त्वाकांक्षी धोरण निश्‍चित केले आहे. जिल्हा पातळीवरून क्षयरोग दुरीकरणासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ‘क्षयमुक्त जिल्हा’ निवडून त्यांना प्रोत्साहन म्हणून ब्रॉंझ, सिल्व्हर, गोल्ड अशी तीन विभागांत निकषानुसार दर्जा व त्यांना आर्थिक किंवा आर्थिकेतर बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. यास सबनॅशनल सर्टिफिकेशन फॉर टीबी एलीनिमेशन म्हणतात, असेही डॉ. कुंभार यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97006 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..