ललित गांधी बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ललित गांधी बातमी
ललित गांधी बातमी

ललित गांधी बातमी

sakal_logo
By

50731

उद्योगाच्या विकासासाठी तंत्रज्ञानाची कास धरावी

मंत्री नारायण राणे ः महाराष्ट्र चेंबरच्या राज्यस्तरीय परिषदेत आवाहन
................
कोल्हापूर, ता. १८ ः महाराष्ट्र भारतात प्रगत राज्य म्हणून नावारूपाला आले आहे, वैद्यकीय उत्पादन, जीडीपीमध्ये पुढे आहे, आत्मनिर्भर भारत बनवणे व महासत्तेकडे वाटचाल करताना सूक्ष्म लघु व मध्यम विभागाकडे आशावादी दृष्टिकोनातून बघितले जात आहे. व्यापार आणि उद्योगाच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरा, असे आवाहन केंद्रीय सुक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चर तर्फे मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय उद्योग परिषदेत ‘मेक इन महाराष्ट्र’ मध्ये श्री. राणे बोलत होते. याच कार्यक्रमात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील उद्योगांना गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र चेंबरने प्रत्येक जिल्ह्यात जाऊन उद्योजक वाढविण्याचे जे काम करते ते कौतुकास्पद आहे. व्यापार उद्योगाच्या विकासासाठी जे जे आवश्यक असेल ते सर्व सहकार्य करण्यात येतील, असे आश्‍वासन दिले.
श्री. राणे म्हणाले, ‘‘आधुनिकरणामुळे उत्पादन वाढते, उत्पादन वाढले, की नफा वाढतो. आधुनिकीकरण ही काळाची गरज असून स्वावलंबी होण्यासाठी अत्यावश्यक आहे. निर्यात वाढवा, आयात कमी करा. महाराष्ट्र चेंबरने राज्यात उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करावे, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना मदत करावी.’’ उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आठ दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन श्री. सामंत यांनी दिले. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनीही विशेष मार्गदर्शन केले.
श्री. राणे यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबरच्या ९४ व्या वार्षिक अहवालाचे अनावरण झाले. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते श्री. राणे व श्री. सामंत यांचा सत्कार झाला. प्रास्ताविकात श्री. गांधी यांनी अमेरिकेत गूळ व आंबा महोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.
राज्याचे पर्यटन व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र मानगावे, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, उपाध्यक्ष तनसुख झांबड, वर्ल्ड ट्रेड सेंटरचे चेअरमन विजय कलंत्री आदी उपस्थित होते.
...........

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97018 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..