अभिलेख वर्गीकरणासाठी कर्मचार्‍यांची धावाधाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिलेख वर्गीकरणासाठी कर्मचार्‍यांची धावाधाव
अभिलेख वर्गीकरणासाठी कर्मचार्‍यांची धावाधाव

अभिलेख वर्गीकरणासाठी कर्मचार्‍यांची धावाधाव

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...

अभिलेख वर्गीकरणासाठी धावाधाव
---
३० सप्‍टेंबरपर्यंत मुदत; सुटीदिवशीही कर्मचारी व्यस्‍त
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १७ : जिल्‍हा परिषद, पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे असणाऱ्या दप्‍तराचे अर्थात अभिलेखाचे वर्गीकरण करण्याचे आदेश दिल्याने सुटी दिवशीही कर्मचारी हजेरी लावत आहेत. वर्गीकरणासाठी ३० सप्टेंबर ही मुदत देण्यात आली. यानंतर कर्मचारीनिहाय ‍दप्तर तपासणी घेतली जाणार आहे. अनेक विभागांचे अभिलेख वर्गीकरण झाले असताना तयार झालेले गठ्ठे ठेवायचे कुठे, असा प्रश्‍‍न निर्माण झाला. औषध भांडारात यासाठी एक मजला दिला आहे. मात्र, लोखंडी कपाट नसल्याने प्रशासनाची अडचण झाली.
जिल्‍हा परिषदेकडे रोज शेकडोंच्या संख्येत पत्रव्यवहार होतो. यात शासनाचे निर्णय, आदेश, शुद्धीपत्रक, परिपत्रक तसेच जिल्‍हा परिषद अंतर्गत झालेले निर्णय, सभा, ठराव, निविदा प्रक्रिया, कामाचे आदेश, पुरवठा आदेश, वैयक्‍तिक लाभार्थींची माहिती, कामांची बिले, गावागावांतून आलेले अर्ज, तक्रारी, लोकप्रतिनिधींनी सांगितलेली कामे अशा पत्रव्यवहाराची मोठी यादी आहे. पत्र व आदेश कोणाचे आहेत, कारवाईबाबतचे अधिकार यानुसार पत्रांचे वर्गीकरण केले जाते. प्रशासनाच्या कामकाजासाठी या अभिलेख्यांचे वर्गीकरण आवश्यक असते. अन्यथा कागदपत्रे, फाईल्‍स शोधताना विलंब होतो. यात काही वेळा संबंधित खातेप्रमुखांना वेळेत माहिती न दिल्याबद्दल दंड होतो. यापेक्षा मोठीही कारवाई केली जाते. त्यामुळेच अभिलेख वर्गीकरणाची मोहीम घेतली आहे.
अभिलेख वर्गीकरण हे अ, ब, क, ड या प्रकारात जतन करण्यात येते. या चार वर्गांचे दप्‍तर हे वेगवेगळ्या रंगांत बांधून ठेवले जाईल. निधी वितरणास स्‍थगिती असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे बराच वेळ आहे. त्या काळात अभिलेख वर्गीकरण करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्‍हाण यांनी घेतला. याची अंमलबजावणी सामान्य प्रशासनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अभिलेख वर्गीकरण पूर्ण करण्यास केवळ १३ दिवस उरले असल्याने सुटीदिवशीही कर्मचारी जिल्‍हा परिषदेत हजेरी लावत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97021 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..