विमानतळ -आमदार ऋतुराज पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमानतळ -आमदार ऋतुराज पाटील
विमानतळ -आमदार ऋतुराज पाटील

विमानतळ -आमदार ऋतुराज पाटील

sakal_logo
By

५०७४५

विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सोडवू
आमदार ऋतुराज पाटील; लक्ष्मीवाडीतील प्रकल्पग्रस्तांसोबत झाली चर्चा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्‍वासन आमदार ऋतुराज पाटील यांनी विमानतळ प्रकल्पग्रस्तांना दिले. जिल्ह्याच्या विकासासाठी कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण आवश्यक आहे. विकास प्रक्रियेत आपल्या सर्वांची साथ गरजेची असल्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांच्या यादीमध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर करून महसूल यंत्रणेने सुधारित यादी तयार करावी, अशा सूचनाही आमदार पाटील यांनी दिल्या.
गडमुडशिंगी लक्ष्मीवाडी येथील विमानतळ प्रकल्पग्रस्तांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार ऋतुराज पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. जिल्हाधिकारी यांनीही असेसमेंट यादीत नाव असलेल्या व्यक्तींनाच पुनर्वसनाचे लाभ मिळतील, असे स्पष्ट केले. याबाबतचा शासन आदेशही दिला जाईल. ज्यांची नावे यादीत नाहीत, त्यांनी त्याबाबतचा अर्ज करून असेसमेंट उतारा जोडावा, असे आवाहन केले.
प्रकल्पग्रस्तांच्या वतीने सागर सोनुले व सहकाऱ्यांनी विविध समस्या मांडल्या. प्रशासनाने बनवलेल्या यादीत अनेकांची नावेच नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. प्रकल्पग्रस्तांची लेखी यादी शासनाने द्यावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर पुनर्वसन कोणत्या सर्व्हे नंबरमध्ये होणार, प्रत्येक कुटुंबाला किती गुंठे प्लॉट मिळणार, प्रकल्पग्रस्तांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार, याची लेखी ग्वाही द्यावी. त्याचबरोबर वीज, रस्ते, गटार, समाजिक सभागृह यासह जीवनावश्यक सुविधा मिळतील, याबाबतही लेखी आश्‍वासन मिळेपर्यंत पुनर्वसनाला संमती देणार नाही, अशी भूमिका घेतली.
यावेळी शिवाजी सोनुले, सतीश सोनुले, अर्जुन माने, रामदास सोनुले, संभाजी सोनुले, अजय सोनुले, विकास सोनुले यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97052 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..