विधवा महिलांच्या पुनर्वसनाचे धोरण करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधवा महिलांच्या पुनर्वसनाचे धोरण करा
विधवा महिलांच्या पुनर्वसनाचे धोरण करा

विधवा महिलांच्या पुनर्वसनाचे धोरण करा

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...

विधवांच्या पुनर्वसनाचे धोरण करा
---
राज्य शासनाकडे मागणी; हेरवाड ग्रामपंचायतीचे ‘बालविकास’ला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १७ : विधवांच्या सन्‍मानाचा ठराव केल्यावर त्या कामाची राज्य शासनाने दखल घेत सकारात्‍मक प्रतिसाद दिला. राज्यातील इतर ग्रामपंचायतींनीही याबाबतचे ठराव करून अनेकांनी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली. आता त्यापुढे जाऊन विधवांच्या पुनर्वसनाचे धोरण तयार करावे, अशी मागणी हेरवाड ग्रामपंचायतीने राज्याच्या बालविकास विभागाकडे केली आहे. त्यानुसार आता जिल्‍हास्‍तरावर विविध विभागांतर्गत याबाबतची कार्यवाही सुरू आहे.
ग्रामपंचायतीने सर्वप्रथम विधवा महिलांच्या सर्वेक्षणाची मागणी केली आहे. मात्र, २०११ नंतर जनगणना झालेली नाही. त्यामुळे विधवा महिलांची संख्या समजलेली नाही. त्यामुळे याबाबत ग्रामपंचायत विभागाने सर्व ग्रामपंचायतींना सूचना देऊन हे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. याबाबत कारवाई करावी, अशी सूचना करण्यात आली. शहरात नगरविकास विभागाने नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका अंगणवाडी व आरोग्यसेवक यांच्यामार्फत ही माहिती संकलित करणे शक्य आहे. या माध्यमातून माहिती संकलित झाल्यास विधवा महिलांबाबतचे धोरण ठरविण्यास मदत होईल.

अनुदान द्या
विधवा महिलांसाठी एक खिडकी योजनेप्रमाणे सुविधा द्याव्यात, तालुकास्‍तरावर महिला व बालकल्याण एकात्‍मिक विकास कार्यालयाने ही जबाबदारी घ्यावी, असेही सुचविले आहे. विधवांच्या पुनर्विवाहास विरोध होतो. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. आंतरजातीय विवाहाला प्रोत्‍साहन देण्यासाठी अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे विधवांच्या मुलांच्या नावे अनामत ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचे पत्र समाजकल्याण विभागाला देण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97059 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..