निदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निदन
निदन

निदन

sakal_logo
By

५०७६७
‘पीटीएम’चे अध्यक्ष
एस. वाय. सरनाईक यांचे निधन
कोल्हापूर : मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम मंडळाचे अध्यक्ष सुभाष यशवंतराव तथा एस. वाय. सरनाईक (वय ६९) यांचे निधन झाले. महापालिकेच्या अग्निशमन दलातून ते मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. त्यांनी १९७१ मध्ये पाटाकडील तालमीच्या ज्युनिअर संघातून फुटबॉल खेळाची कारकिर्द सुरू केली. त्यांनी महाविद्यालयीन काळात शिवाजी विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व केले. पाटाकडील तालीमसह कोल्हापूर महानगरपालिका संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी कोल्हापूरसह, पुणे, मुंबई, कलकत्ता, हैद्राबाद येथील स्पर्धेत ठसा उमठवला होता. फुटबॉलबरोबरच राज्यभरातील शरीरसौष्ठव स्पर्धेतही त्यांनी विशेष ओळख निर्माण केली होती. पाटाकडील तालीम परिसरात युवक संस्कार, फुटबॉल शिबिरे आणि खेळाडूंना नोकरी मार्गदर्शनसाठी त्यांनी पुढाकार घेतला. गेले काही दिवस प्रकृत्ती अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. १८) आहे.

५०७८९
सुशीला जाधव
वडणगे ः येथील सुशीला बाळासाहेब जाधव (वय ६५) यांचे निधन झाले. वडणगे सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष, माजी सरपंच बाळासाहेब खंडेराव जाधव यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १८) सकाळी आहे.

५०८३८
महादेव कांबळे
कोल्हापूर ः कोपार्डे (ता. करवीर) येथील महादेव लक्ष्मण कांबळे (वय ३४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, आई, तीन भाऊ आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १८) आहे.

३०८१
शांताबाई पातले
सोळांकूर : पनोरी (ता. राधानगरी) येथील श्रीमती शांताबाई गणपती पातले (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १८) आहे.

०००५१
सुनील कांबळे
रांगोळी ः येथील सुनील कल्लापा कांबळे (वय ५५) यांचे निधन झाले. माजी ग्रामपंचायत सदस्या राधाबाई कांबळे यांचे ते पती होत. त्यांच्या मागे पत्नी, मुले असा परिवार आहे.

२९८८
आनंदा पाटील
सोळांकूर ः बुजवडे (ता. राधानगरी) येथील आनंदा दौलू पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १८) आहे.


७३०७
प्रमोद उपाध्ये
घुणकी : किणी (ता. हातकणंगले) येथील प्रमोद जीवंधर उपाध्ये (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, भाऊ असा परिवार आहे.

50776
पुष्पलता देशमुख
इचलकरंजी ः शिरदवाड (ता. शिरोळ) येथील श्रीमती पुष्पलता बाबासाहेब देशमुख-पाटील (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ॲड. ऋतुराज पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

50778
वनमाला पाटील
रांगोळी ः येथील श्रीमती वनमाला सुधाकर पाटील (वय ७७) यांचे निधन झाले. ग्रामपंचायत सदस्या उज्ज्वला संदीप पाटील यांच्या सासू होत. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

३८९८
भैरवनाथ पाटील
म्हाकवे ः येथील भैरवनाथ रावजी पाटील (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते पाटबंधारे विभागातून निवॄत झाले होते.

२८१२
बाबासोह गडकरी
उजळाईवाडी ः गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील बाबासो नाना गडकरी (वय ८१) यांचे निधन झाले. ते येथील विठ्ठल रुक्मिणी ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष होते.
रक्षाविसर्जन रविवारी (ता. १८) गडमुडशिंगी येथे आहे.

४०८२
बाळगोंडा माळकर
कागल : येथील धनगर गल्लीत राहणारे बाळगोंड रामा माळकर (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १८) आहे.

११७४
धोंडिराम ठाणेकर
सोनाळी ः गाडेगोंडवाडी (ता. करवीर) येथील धोंडिराम दिनकर ठाणेकर (वय ४२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

१६८०
शेवंताबाई कोईगडे
हळदी ः कुरुकली (ता. करवीर) येथील शेवंताबाई लहू कोईगडे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.

४०८६
प्रकाश गवळी
कागल : येथील प्रकाश बाबूराव गवळी (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, पाच मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १८) आहे.

50799
विजया चाळके
कोल्हापूर : कसबा बावडा, रेणुका मंदिर येथील श्रीमती विजया रामचंद्र चाळके (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, सून, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश चाळके यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १८) आहे.

२९९०
सर्जेराव पाटील
सरवडे ः येथील दत सहकारी दूध संस्थेचे कर्मचारी सर्जेराव सखाराम पाटील (वय ५१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी,भाऊ असा परिवार आहे.

२००९
सदाशिव कुंभार
पोहाळे तर्फ आळते ः येथील सदाशिव दत्तू कुंभार (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १९) आहे.

३१३१
शामराव पाटील
कोल्हापूर : कोगील बुद्रुक (ता. करवीर) येथील शामराव हरी पाटील (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १८) आहे.

२४३९
नानासो पाटील
गारगोटी : आकुर्डे (ता. भुदरगड) येथील नानासो दादा पाटील-बेनिक्रेकर (वय ७५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन उद्या (ता. १८) आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97066 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..