मतदान ओळखपत्र आधार लिंक वादात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदान ओळखपत्र आधार लिंक वादात
मतदान ओळखपत्र आधार लिंक वादात

मतदान ओळखपत्र आधार लिंक वादात

sakal_logo
By

मतदान ओळखपत्राला
‘आधार’ जोडणी वादात
‘ऐच्छिक’ पण सक्तीने जोडणीची मोहीम; प्रत्यक्षात काम करणारे त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडणी मोहीम वादात सापडली आहे. ओळखपत्रासाठी आधार क्रमांक जोडणी करणे हे ‘ऐच्छीक’ आहे. तरीही सक्तीने जोडणीची प्रक्रिया सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. खऱ्या मतदारालाच मतदान अधिकार मिळायचा असेल तर ही जोडणी मतदारांनीच करून शासनाला सहकार्य करावे, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडणीची मोहीम देशभर सुरू आहे. यासाठी नेमलेला बीएलओ (ब्लॉक लेव्हल ऑफिसर) नागरिकांच्या दारात जाऊन त्याची माहिती मागतो, तेव्हा नागरिक त्याला उभे करून घेत नाहीत. या मोहिमेची आवश्‍यक तितकी प्रसिद्धी झाली नाही. नागरिकांकडून प्रतिसादच मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत, असे असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयातून रोज आढावा घेतला जातो. जोडणीची संख्या का वाढत नाही, याबाबतची विचारणा केली जात आहे.
अनेक शासकीय कार्यालये, शाळा यांच्यातील लिपिकांना बीएलओ म्हणून नेमले आहे. प्रत्येक बूथ प्रमाणेत्यांची नेमणूक आहे. काही बीएलओ यांना पहिले कार्यालय, शाळा येथील कामे करा आणि नंतर तुमचे बीएलओचे काम पाहा अशाही सूचना दिल्या जात असल्याचे सांगण्यात येते. परिणामी हे बीएलओ स्वतःच्या शाळेतील किंवा कार्यालयातीलच कामात असल्याने रोजच्या रोज त्यांच्याकडून घरोघरी पोहोचणे शक्य होत नाही. मात्र या जोडणी मोहिमेसाठी वरिष्ठांकडून वारंवार आकडेवारी मागितले जात असल्याने बीएलओ, सुपरवायझर यासह इतर अधिकाऱ्यांवर दबाव येत असल्‍याच्या तक्रारी आहेत.
----------
जनजागृती गरजेची
शासनाने याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. घरोघरी येणाऱ्या बीएलओला सहकार्य करावे, ‘ऐच्छिक’ असले तरीही मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडून (लिंक करणे) प्रशासनाला सहकार्य करावे याचा संदेश स्थानिक पातळीवर घरोघरी पोचणे आवश्यक आहे. जोपर्यंत या जोडणी मोहिमेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत नागरिकांकडून प्रतिसाद मिळणार नाही, असेही मत प्रत्यक्षात काम करणाऱ्यांकडून बातमीत नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगण्यात येते.
-------------

राज्यस्तरावरून जोडणी मोहिमेचा आढावा वारंवार घेतला जात आहे. त्यामुळे आम्हीही नियमित आढावा घेतो. ही जोडणी ऐच्छिक असली तरीही मतदारांच्या फायद्याची आहे. आपला मतदानाचा हक्क अबाधित रहावा, यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान ओळखपत्राला आधार क्रमांकाचा जोडणी करावी.
- भगवान कांबळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97108 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..