दौलत कारखान्यातील संप राजकीय ः विकास सुर्वे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौलत कारखान्यातील संप राजकीय ः विकास सुर्वे
दौलत कारखान्यातील संप राजकीय ः विकास सुर्वे

दौलत कारखान्यातील संप राजकीय ः विकास सुर्वे

sakal_logo
By

‘अथर्व-दौलत’मधील
संप राजकीय हेतूने
विकास सुर्वे; कारखान्याला बेळ देणे हिताचे
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः दौलत शेतकरी सहकारी कारखान्यामुळे चंदगड तालुक्यातील उद्योगधंद्यांना चालना मिळाली आहे. हा कारखाना इथल्या शेतकऱ्यांसाठी गरजेचा आहे. मात्र काही राजकीय शक्ती स्वार्थासाठी अथर्व दौलत कारखाना बंद पाडू इच्छितात. सध्या कारखान्यात सुरू असणारा कामगारांचा संप हा राजकीय हेतूने सुरू आहे, असा आरोप मराठा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव विकास सुर्वे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
सुर्वे म्हणाले, ‘‘दौलत कारखाना राज्याच्या सीमेलगत आहे. चंदगड तालुक्यातील ऊस दौलत कारखान्यात जातो. शेजारच्या बेळगाव जिल्ह्यात सुमारे २४ साखर कारखाने आहेत. या मोठ्या स्पर्धेला तोंड द्यायचे असेल तर दौलत साखर कारखान्याला बळ देणे आवश्यक आहे. दौलत कारखाना सध्या अथर्व इंटर ट्रेडर्सचे मालक मानसिंग खोराटे हे मराठा उद्योजक चालवत आहेत. त्यांना हा कारखाना गेल्या दोन वर्षात चांगला चालवला असून कामगारांना वेळेत पगार मिळत आहेत. तालुक्यातील शेतकरी, वाहतूकदार, हॉटेल चालक या सर्वांच्या दृष्टीने दौलत चालणे आवश्यक असून कामगारांनी व्यवस्थापनाशी चर्चा करून संप मिटवावा. सध्या जो संप सुरू आहे तो राजकीय हेतूने सुरू आहे. काही राजकीय मंडळी कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा बहुउद्देशीय संस्था नेहमीच कारखाना टिकवण्याच्या प्रयत्नात असून तडजोडीच्या भूमिकेला पाठिंबा आहे.’’
पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष प्रसन्न शिंदे, उपाध्यक्ष उदय लाड, उद्योजक प्रतिनिधी रमेश आबिटकर, खजानीस सम्राट बराले, मोहन शिंदे हे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97124 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..