पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस
पाऊस

पाऊस

sakal_logo
By

शहरासह जिल्ह्यात
पावसाची पूर्ण उघडीप
राजाराम बंधाऱ्याची पातळी २४ फुटांवर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः शहरासह जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी सायंकाळी २४ फूट आठ इंचांपर्यंत खाली पोहोचली आहे. जिल्ह्यात अद्यापही १७ बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणाचा सहा क्रमांकाचा स्वयंचलीत दरवाजा खुला असून, त्यातून सुमारे ३ हजार २८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कोल्हापूरसह जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. आज दिवसभरात ऊन असल्यामुळे गेल्या आठवड्यापासून आज जनजीवन पूर्ववत झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाची केवळ भुरभुर आहे. डोंगरी भागात किरकोळ पावसाच्या सरी झाल्या असून, सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण सरासरी ५.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हातकणंगले १.१, शिरोळ २, पन्हाळा ७.९, शाहूवाडी १३.३, राधानगरी १०.८, गगनबावडा १९.७, करवीर ३.८, कागल २.९, गडहिंग्लज १.७, भुदरगड ७.६, आजरा ६, चंदगड ६.२ असा तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये झाला आहे. तसेच बंधाऱ्यांची पाणीपातळी अशी : राजाराम २४.१०, सुर्वे २४.६, रुई ५४.९, इचलकरंजी ५२, तेरवाड ४९, शिरोळ ४२.६, नृसिंहवाडी ४३.८, राजापूर २९.३, सांगली १८.३ व अंकली २१.८ फूट.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97169 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..