आवश्यक- संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक- संक्षिप्त
आवश्यक- संक्षिप्त

आवश्यक- संक्षिप्त

sakal_logo
By

५०८३७
घाटगे ग्रुपतर्फे रक्तदान,
नेत्रदान शिबिराचे आयोजन
कोल्हापूर ः येथील घाटगे ग्रुपचे संचालक व मोहन ऑटो इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर झाले. सामाजिक बांधिलकी जपणारा ग्रुप म्हणून घाटगे ग्रुप सुपरिचित आहे. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गरजूंना रक्त पुरवठा व्हावा आणि नेत्र तपासणीच्या माध्यमातून कर्मचारी आणि त्यांच्या पालकांची योग्य तपासणी व्हावी, या हेतूने हे उपक्रम राबवल्याचे तेज घाटगे यांनी सांगितले.
माई ह्युंडाईच्या कोल्हापूर, सांगली व रत्नागिरी येथील शोरूममध्ये ही शिबिरे झाली. माई ह्युंडाईचे संचालक दिग्विजय राजेभोसले यांच्या हस्ते नंदादीप नेत्रालयाचे मार्केटिंग हेड शिरीष पाटील यांचा व जनरल मॅनेजर विशाल वडेर यांच्या हस्ते वैभवलक्ष्मी ब्लड सेंटरच्या डॉ. प्रतीक्षा सूर्यवंशी यांचा सत्कार झाला. या वेळी प्रशासन प्रमुख उमेश पाटील, विलास प्रभू, महेश गेज्जी, राहुल भोसले, युवराज गायकवाड आदी उपस्थित होते.

संवेदना फौंडेशनचे डॉ. जाधव अध्यक्ष
कोल्हापूर ः रस्ते अपघात व वाहतूक कोंडीवर प्रबोधन करणाऱ्या येथील संवेदना फौंडेशनच्या अध्यक्षपदी डॉ. ऋषिकेश जाधव यांची निवड झाली. डॉ. प्रणव पाटील सचिवपदी तर डॉ. अभिजित मुळीक यांची खजानीसपदी निवड झाली. संस्थेचे मावळते अध्यक्ष संजय कात्रे, उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील, खजानीस सुहास नाईक, विश्वस्त शिरीष पुजारी, डॉ. आदित्य काशीद, डॉ. श्रद्धा जाधव आदींच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97194 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..