गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त

sakal_logo
By

50847
हसुरसासगिरी : शहिद जवान आप्पाजी कदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करताना सुभाष निकम, मधुकर येसणे, पांडुरंग पाटील, अण्णासाहेब शिरगावे आदी.

शहिद जवानाच्या स्मृतिदिनी
शैक्षणिक साहित्य वाटप
गडहिंग्लज : हसुरसासगिरी (ता. गडहिंग्लज) येथील शहिद जवान नायब सुभेदार आप्पाजी कदम यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. जीवन शिक्षण मंदिर व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना साहित्य देण्यात आले. गेली २६ वर्षे कदम कुटुंबीयांनी हा वारसा जपला आहे. मधुकर येसणे लिखित स्मृतिगंध या पुस्तकाचेही वितरण झाले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन झाले. ऑर्डनरी कॅप्टन पांडुरंग पाटील, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक नंदकुमार वाईंगडे, माजी संचालक सुभाष निकम, विष्णूपंत कदम, मधुकर येसणे यांची भाषणे झाली. मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुधीर उर्फ आप्पा शिवणे, सरपंच शांता कदम, माजी सैनिक कुमार पाटील, सुबराव पाटील, दत्तात्रय मगदूम, शिवाजी पाटील, प्रकाश चव्हाण, मारुती परिट, शंकर पवार, आप्पा रेडेकर, राजेंद्र कांबळे, विजय बिरंजे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्रीकांत कल्लोळे यांनी प्रास्ताविक केले. अयाज बागवान यांनी सूत्रसंचालन केले. विठ्ठल कदम यांनी आभार मानले.
--------------
जागृती हायस्कूलमध्ये कार्यक्रम
गडहिंग्लज : येथील जागृती हायस्कूलमध्ये हिंदी दिनानिमित्त कार्यक्रम झाला. मुख्याध्यापक जी. एच. गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी हिंदी भाषेचे महत्व पटवून दिले. विद्यार्थिनींनी काव्य वाचन केले. तेजस्विनी कापसे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य विजय चौगुले, एस. बी. अनावरे, आर. बी. लोखंडे, प्रवीण पाटील, बाळासाहेब खरात, प्रकाश गायकवाड, सौ. ए. एस. पाटील, डी. पी. महाले आदी उपस्थित होते.
-----------------
50852
गडहिंग्लज : भाजपतर्फे ई-श्रम कार्डचे वितरण करताना समरजीत घाटगे. शेजारी भाजपचे पदाधिकारी.

सेवा पंधरवड्याला
भाजपतर्फे प्रारंभ
गडहिंग्लज, ता. १८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे सेवा पंधरवड्याचा प्रारंभ करण्यात आला. या अंतर्गत २ ऑक्टोबरपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गडहिंग्लज शहरात ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात आले. शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, अनिल खोत, संदीप नाथबुवा, युवराज बरगे, प्रितम कापसे, संदीप रोटे, सतीश हळदकर, सुनील गुरव, प्रदीप पाटील, सुभाष चोथे, मारुती राक्षे, अनिल गायकवाड, अमर पोटे आदी उपस्थित होते. दरम्यान, नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, हेमंत कोलेकर, अशोक पांडव, अशिष साखरे, आकाश दळवी, राजू दावणे, संतोष नाईक आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97236 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..