माझ्या कार्यकाळातील हिशेब चोख : रक्ताडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माझ्या कार्यकाळातील हिशेब चोख : रक्ताडे
माझ्या कार्यकाळातील हिशेब चोख : रक्ताडे

माझ्या कार्यकाळातील हिशेब चोख : रक्ताडे

sakal_logo
By

माझ्या कार्यकाळातील
हिशेब चोख : रक्ताडे
गडहिंग्लज, ता. १८ : संघटनेच्या वादात परीक्षा समितीचे काम थांबायला नको, म्हणून सहा महिन्यांपूर्वी जिल्ह्याच्या मूळ संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राज्य कार्यकारिणीच्या आदेशानुसार माझ्याकडे सचिवपदाची जबाबदारी दिली. विनामोबदला सेवाभाव म्हणून मी सचिवपदी कार्यरत आहे. माझ्या कार्यकाळातील सर्व हिशेब चोख असल्याचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या परीक्षा समितीचे सचिव पी. बी. रक्ताडे यांनी स्पष्ट केले. त्याबाबतचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या काही स्वयंघोषित मंडळींनी प्रसिद्धी व स्टंटबाजीसाठी निवृत्त प्राध्यापकांचा रस्त्यावर सत्कार करण्याचा प्रकार पूर्णत: चुकीचा आहे. संघटना आणि परीक्षा समिती या दोन्हीही गोष्टी भिन्न आहेत. परीक्षा समितीचे काम हे प्रश्‍नपत्रिका तयार करून महाविद्यालयांना वितरीत करण्यापुरतेच मर्यादित आहेत. परीक्षा समिती ही कोणा एका व्यक्तीच्या मालकीची नसून सर्वांचाच त्यावर अधिकार आहे. वरिष्ठांचा वाद असताना आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही रक्ताडे यांनी पत्रकातून दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97271 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..