‘किसान सन्मान’ योजनेतील केवायसीसाठी गावोगावी शिबीरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘किसान सन्मान’ योजनेतील केवायसीसाठी गावोगावी शिबीरे
‘किसान सन्मान’ योजनेतील केवायसीसाठी गावोगावी शिबीरे

‘किसान सन्मान’ योजनेतील केवायसीसाठी गावोगावी शिबीरे

sakal_logo
By

ई केवायसीसाठी
गावोगावी शिबीरे
किसान सन्मान योजना; गडहिंग्लजला महसूल खात्याचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थींच्या ई-केवायसी करण्यासाठी आता तालुक्यातील गावागावात शिबीरे सुरु झाली आहेत. त्यासाठी तालुक्यातील शाहू सुविधा, आपले सरकार सुविधा केंद्र चालक, ऑपरेटरची नियुक्ती केली आहे. तहसीलदार दिनेश पारगे यांनी या शिबीराचे नियोजन केले आहे.
पीएम किसान योजनेतील अनुदान लाभार्थींना सुलभरित्या मिळावे म्हणून केंद्र शासनाने विविध उपाययोजना सुचवल्या आहेत. बँक खाती आधारकार्डशी जोडणे, लाभार्थीचे ई-केवायसी करणे, भौतिक तपासणीतून पात्र-अपात्रता निश्‍चित करणे, त्यातून अपात्र लाभार्थी वगळणे, पीएम किसान पोर्टलवरील डाटा दुरुस्त करणे, भूमीअभिलेख डाटा पीएम किसान पोर्टलवरील डाटा सोबत एकत्रित करुन लाभार्थींची माहिती अद्यावत करणे आदी उपाययोजना करण्याच्या सूचना आहेत. एप्रिल २०२२ पासूनचे अनुदानाचे हप्तते आधारक्रमांकांशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे. यामुळे लाभार्थींची माहिती अद्ययावत करणे व ई केवायसी करण्याची मुदत २६ सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. शंभर टक्के लाभार्थींची ई केवायसी करण्यासाठी श्री. पारगे यांनी तालुक्यातील प्रत्येक गावासाठी शाहू सुविधा, आपले सरकार केंद्र चालक, ऑपरेटरची नियुक्ती केली आहे. नियुक्त केलेल्या संबंधित गावचा डाटा उपलब्ध करुन माहिती अद्ययावत करण्याच्या सूचना त्यांना श्री. पारगे यांनी दिल्या आहेत. या कामात कोणतीही कसूर होणार नाही, याची दक्षताही घेण्याची सूचना केली आहे. एकेका व्यक्तीकडे गावातील खातेदार संख्येनुसार एक ते पाच गावांची जबाबदारी दिली असून २२ सप्टेंबरअखेर हे काम पूर्ण करण्याची सूचनाही दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97287 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..