गडहिंग्लजला चर्च परिसर सुशोभीकरणाचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला चर्च परिसर सुशोभीकरणाचे लोकार्पण
गडहिंग्लजला चर्च परिसर सुशोभीकरणाचे लोकार्पण

गडहिंग्लजला चर्च परिसर सुशोभीकरणाचे लोकार्पण

sakal_logo
By

50917
गडहिंग्लज : ख्रिस्ती समाजातर्फे हसन मुश्रीफ यांचा सत्कार करताना फादर ज्यो मंतेरो. शेजारी फादर नेगी, जे. बी. बारदेस्कर, किरण कदम, सुरेश कोळकी, वसंत यमगेकर, सतीश पाटील आदी.

मुश्रीफ यांच्याकडून मानवतावादी काम
फादर ज्यो मंतेरो; गडहिंग्लजला चर्च परिसर सुशोभीकरणाचे लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : आमदार हसन मुश्रीफ यांनी गरिबांमध्येच परमेश्वर पाहिला आहे. राजकारण बाजूला ठेवून नेहमीच ते गरिबांच्या पाठीशी देवमाणूस म्हणून उभे राहतात. मानवतावाद आणि सेवाधर्मातून त्यांनी केलेल्या गोरगरिबांच्या कामामुळे प्रभू येशू ख्रिस्ताचे ते अनुयायी ठरले आहेत, असे गौरवोद्‌गार ख्रिस्ती धर्मगुरू फादर ज्यो मंतेरो यांनी काढले.
येथील संत अँथोनी चर्च परिसराचे सुशोभीकरण आमदार मुश्रीफ यांच्या फंडातून झाले आहे. त्याचे लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झाले. फादर मंतेरो म्हणाले, ‘‘आमदार मुश्रीफ हे त्यांच्या सेवा कार्यामुळे पुढील शंभरहून अधिक वर्षे जनतेच्या स्मरणात राहतील. लोकप्रतिनिधी म्हणून विकासाबरोबरच सेवाकार्य आणि विशेषता त्यांनी केलेली वैद्यकीय सेवा हे मानवता वादाचे अत्युच्च शिखर आहे.’’
आदर्श शिक्षक पुरस्काराप्राप्त अरविंद बारदेस्कर व रोझारिओ रॉड्रीग्ज यांचा सत्कार झाला. फादर नेगी, किरण कदम, प्रा. किसनराव कुराडे, वसंत यमगेकर, उदय जोशी, सुरेश कोळकी, हारुण सय्यद, सतीश पाटील, रेश्मा कांबळे, दीपक कुराडे, रामगोंड उर्फ गुंडू पाटील, महेश सलवादे, अमर मांगले उपस्थित होते.
जे. बी. बारदेस्कर यांनी स्वागत केले. अरविंद बारदेस्कर यांनी आभार मानले.

कोट
प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे मानवता आणि सहिष्णुतेचे महासागर आहेत. शांतताप्रिय असणारा ख्रिस्ती समाज सहिष्णुतेसह प्रेम, सहकार्य आणि शत्रूलासुद्धा आपलं मानणारा आहे. याच विचारावरून मी आयुष्यभर ही वाट चालत राहिलो.
- हसन मुश्रीफ, आमदार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97295 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..