मराठी भाषेचा सन्मान आद्यकर्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी भाषेचा सन्मान आद्यकर्तव्य
मराठी भाषेचा सन्मान आद्यकर्तव्य

मराठी भाषेचा सन्मान आद्यकर्तव्य

sakal_logo
By

50957
------------
मराठी भाषेचा सन्मान आद्यकर्तव्य
प्रा. विसुभाऊ बापट; ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ची मांडणी
इचलकरंजी, ता. १८ ः मराठी भाषेचा सन्मान करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन प्रा. विसुभाऊ बापट यांनी केले. येथील दिगंबर जैन समाज व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लड बँक येथे अरिहंत व्याख्यानमालते पहिल्या दिवशी त्यांनी ‘कुटुंब रंगलय काव्यात’ या विषयाची मांडणी केली. यामध्ये त्यांनी मराठीतील नामवंत कवी-कवयित्रींच्या कविता ओघवत्या शैलीत सादर केल्या.
प्रा. बापट म्हणाले, ‘‘मराठी भाषा ही माय मराठी जगली पाहिजे, वाढली पाहिजे आणि सर्वांच्या ओठी-पोठी असली पाहिजे. कारण ती बाया बापड्यांची भाषा आहे. ती अंत:करणाची असते. ती हृदयातून निघते. ती व्यवहारात वापरली जाते. म्हणून मराठी भाषिकांनी मराठी भाषेचा सन्मान व आदर सर्वानी केला पाहिजे तरच मराठी भाषेला भविष्यकाळ उज्‍ज्वल आहे.’’
दोन तास आपल्या कविता सादरीकरणाने त्यांनी रसिकांना खिळवून ठेवले. इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, कुसुमाग्रज यांच्यापासून अलीकडच्या कवी- कवयत्रींच्या कविता मधुर आवाजात सादर केल्या. भावगीते, भक्तीगीत, बडबडगीत, प्रेमगीत, विडंबनगीत सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. बहिणाबाईंच्या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. अजित खंजिरे, अजित कोईक, बाळासाहेब केटकाळे, बी. एम. पाटील, राहुल खंजिरे, चंद्रकांत चौगुले, उदय चौगुले, बाबा हूपरे, डॉ. पी. जे. बडबडे, डॉ. कुबेर मगदूम, सुरेश चौगुले, महेंद्र बालर, लिंगराज कित्तुरे आदी उपस्थित होते. संजय मगदूम यांनी स्वागत केले. चंद्रकांत पाटील यांनी प्रस्तावना केली. पाहुण्यांचा परिचय मोहन चौगुले यांनी करून दिला. सूत्रसंचालन तीर्थंकर माणगावे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97338 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..