जी. डी. बापूंचे विचार आजही महत्वाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जी. डी. बापूंचे विचार आजही महत्वाचे
जी. डी. बापूंचे विचार आजही महत्वाचे

जी. डी. बापूंचे विचार आजही महत्वाचे

sakal_logo
By

50960
--------
जी. डी. बापूंचे विचार आजही महत्त्‍वाचे
डॉ. बाबूराव गुरव; इचलकरंजीत समाजवादी प्रबोधिनीतर्फे व्याख्यान
इचलकरंजी, ता. १८ ः क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड हे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील आणि प्रतिसरकारातील एक लढवय्या सेनानी होते. स्वातंत्र्य कशासाठी आणि कुणासाठी मिळवायचे याबाबतच्या त्यांच्या संकल्पना अतिशय स्पष्ट होत्या. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही ते शेतकरी व कष्टकऱ्यांचे राज्य आणि समाजातील शेवटच्या माणसाच्या उन्नतीसाठी झटत राहिले. सहकारापासून शिक्षणापर्यंत आणि शेतीमालाच्या किमान हमीभाव मागणीपासून समाजवादी समाजरचनेच्या प्रस्थापनेपर्यंत त्यांनी मांडलेले विचार हे आजही अतिशय महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांनी व्यक्त केले.
येथील समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंचे विचार आणि वर्तमान’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी आमदार अरुण लाड होते. आमदार लाड म्हणाले, ‘‘आजच्या अस्वस्थ वर्तमानामध्ये क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंची वैचारिक भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. संपूर्ण आयुष्य समाजासाठी वाहिलेल्या जी. डी. बापूंनी दिलेले योगदान हे आपणा सर्वांनाच प्रेरणादायी आहे. आजच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अराजकसदृश परिस्थितीत त्यांचे विचार हे आपल्याला मार्गदर्शक ठरतील. या भूमिकेतूनच बापूंच्या जन्मशताब्दीकडे आपण पाहत आहोत.’’
जयकुमार कोले, माजी आमदार राजीव आवळे, ॲड. सतीश चौगुले, अमर खोत, अजितमामा जाधव, प्रा. अशोक दास, धोंडिबा कुंभार, सदा मलाबादे, बबन बालिघाटे, धनंजय सागावकर, राजन मुठाणे आदी उपस्थीत होते. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. रमेश लवटे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97344 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..