कमर्शिअल बँक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कमर्शिअल बँक
कमर्शिअल बँक

कमर्शिअल बँक

sakal_logo
By

50968

कमर्शिअल बँकेतर्फे सभासदांना
१५ टक्के लाभांश देण्यात येणार

कोल्हापूर, ता. १८ ः बँकेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा ठराव कमर्शिअल को-ऑप बॅंकेच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केला. राजर्षी शाहू स्मारक भवनात सभा सभा झाली. अध्यक्षस्थानी बॅंकेचे अध्यक्ष गौतम जाधव होते. त्यांनी सभासदांना अधिकाधिक व्यवहार बँकेमध्ये करण्याचे आवाहन केले.
अहवाल सालात दिवंगत झालेल्या मान्यवर व सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत अरविंद बोंगाळे यांनी वाचन केलेल्या विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी आवाजी मतदानाने मंजुरी दिली. सभासद जे. डी. जाधव-कसबेकर, प्रा. रुपा शहा, एस. पी. वाघापूरकर आदींनी विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्ष जाधव, संचालक राजेंद्र डकरे, अ‍ॅड. प्रशांत शिंदे, प्रा. अमरसिंह शेळके यांनी उत्तरे दिली. सभासदांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन संचालक मंडळाने दिले. १० वी, १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या पाल्यांचा तसेच कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा गौरव करण्यात आला. बॅंकेच्या ६५ वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा सत्कार झाला.
संचालक सर्वश्री भाऊसाहेब सावंत, रामराव पवार, रामचंद्र कुंभार, अरुण गावडे, अमोल निगडे, सुरेश इंगवले, दीपक गाडवे, राजीव रणदिवे, शर्मिला कणेरकर, रंजना वायचळ, बी. आर. मोहिते आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष अतुल शहा यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97352 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..