सेवा पंधरवड्याला कोवाडमधून सुरूवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवा पंधरवड्याला कोवाडमधून सुरूवात
सेवा पंधरवड्याला कोवाडमधून सुरूवात

सेवा पंधरवड्याला कोवाडमधून सुरूवात

sakal_logo
By

सेवा पंधरवड्याला
कोवाडमधून सुरूवात
कोवाड, ता. १८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चंदगड तालुका भारतीय जनता युवा मोर्चातर्फे चंदगड तालुक्यात सेवा पंधरवडा उपक्रमाचे आयोजन केले आहे. येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात रक्तदान शिबिर घेऊन सेवा पंधरवड्याचा प्रारंभ केला. शिबिरात ४८ तरुणांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. या वेळी प्राचार्य डॉ. माधवी पवार, वाय. बी. पाटील, माजी सभापती यशवंत सोनार, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, अनिल शिवनगेकर उपस्थित होते.
अनिल शिवनगेकर यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मण यादव, गणपत पाटील, अशोक कदम यांनी स्वागत केले. भरमूआण्णा पाटील म्हणाले, ‘‘सामान्य नागरिकांच्या तक्रारी अर्जांवर निपटारा व्हावा, यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सेवा पंधरवड्यात सरकार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदतनिधीचे वितरण करणार आहे. यांसह शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार असल्याने या उपक्रमाचे आयोजन केले असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.’’ या वेळी भावकू गुरव, भरमू पाटील, अश्‍विन पाटील, अशोक कदम, जोतिबा वांद्रे, सागर पाटील, राजू पाटील, महेश पाटील, रामू चिंचणगी उपस्थित होते. लक्ष्मण यादव यांनी सूत्रसंचालन केले. अशोक कदम यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97364 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..