- | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-
-

-

sakal_logo
By

50979
वडणगे ः येथे आईदुर्गा फाउंडेशनतर्फे झिम्मा-फुगडी महोत्सवातील विजेत्‍या महिलांसमवेत अश्विनी ढेंगे, अस्मिता दिघे.

आईदुर्गा फाउंडेशनतर्फे
वडणगेत झिम्मा-फुगडी महोत्सव
वडणगे : येथे आईदुर्गा फाउंडेशन आयोजित झिम्मा-फुगडी महोत्सवाला महिलांचा प्रतिसाद मिळाला. महोत्सवात २५० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. महोत्सवात महिलांसाठी काटवटकणा, घागर घुमवणे, सूप नाचवणे, फुगडी व झिम्मा खेळ अशा विविध पारंपरिक खेळांच्या स्पर्धा झाल्या. मौरवी स्टुडिओच्या प्रणोती नाटेकर यांनी प्रथम तीन विजेत्यांना मानाची पैठणी साडी पुरस्कृत केली. महिला सबलीकरण या विषयावर अस्मिता दिघे यांनी मार्गदर्शन केले. प्रथम क्रमांकाच्या विजेत्या पूजा पाटील ठरल्या तर द्वितीय क्रमांक विजेत्या शिल्पा पाटील आणि तृतीय क्रमांक विजेत्या रुपाली जाधव ठरल्या. कार्यक्रमाचे आयोजन व इतर बक्षिसे आईदुर्गा फाउंडेशनच्या अध्यक्षा अश्विनी सतीश ढेंगे यांच्यातर्फे देण्यात आली. अर्पिता राबाडे, शैलजा पोवार यांनी सूत्रसंचालन केले.

50983
कदमवाडी ः येथील न्यू शिवशक्ती तरुण मंडळातर्फे मान्यवरांचा सत्कार करताना आमदार हसन मुश्रीफ आदी मान्यवर.

न्यू शिवशक्ती तरुण मंडळातर्फे महाप्रसाद
कदमवाडी : जाधववाडी घोडकेवाडी येथील न्यू शिवशक्ती तरुण मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबविले असून, यापुढेही मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. मंडळ आयोजित महाप्रसाद वाटपप्रसंगी ते बोलत होते. युवराज यश मालोजीराजे छत्रपती, शेती उत्पन्न बाजार समिती सचिव जयवंत पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र डकरे, प्रकाश कुंभार- सरवडेकर, संगीता काटकर, राजेंद्र शेळके, नंदकिशोर डकरे, उत्तम जाधव, सिद्राम आबणे, अभिषेक जाधव, प्रवीण तळेकर, अनिल साळोखे, मंडळाचे अध्यक्ष बबन घोडके, उपाध्यक्ष गजानन देसाई, सचिव शुभम पाडळकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97367 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..