मोहोर अन्‌ म्हाळाचा महिना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोहोर अन्‌ म्हाळाचा महिना
मोहोर अन्‌ म्हाळाचा महिना

मोहोर अन्‌ म्हाळाचा महिना

sakal_logo
By

50996
कोल्हापूर : लक्ष्मीपुरी मंडईत मोहोर विक्री करणारा एक शेतकरी. (सर्व छायाचित्रे : अमोल सावंत)

मोहोर खरेदी करण्यासाठी गर्दी
--
पितरांसाठीच्या नैवेद्यात भाजीला महत्त्वाचे स्थान
--
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : महालय श्राद्ध (म्हाळ) सुरू आहे. २५ तारखेला सर्वपित्री दर्श अमावास्या (अमावास्या महालाय) असून, या अमावास्येपर्यंत प्रत्येक दिवशी विविध प्रकारचे श्राद्ध विधी सांगितलेले आहेत. या श्राद्धासाठी मोहोर (डायस्कोरिया पेन्टाफायला) नावाच्या वेलवर्गीय वनस्पतीला महत्त्व आहे; कारण पितरांसाठी जो नैवेद्य असतो, त्यात उकडलेल्या मोहोराची भाजी लागते. यासाठी मोहोर किंवा मुंडावळ्या घेण्यासाठी लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ मार्केटमध्ये गर्दी आहे.
सध्या मोहोरची १० रुपयांना वाटा या पद्धतीने विक्री होत आहे. विशेषत: ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीत हा मोहोर येतो. मोहोर पश्‍चिम घाटात कुंपणावर किंवा झाडांच्या आधारावर तो येतो. या वेलाला जमिनीत कंद येतो. हा मोहोर जसा खातो, तशाच पद्धतीने कंदही भाजून खाल्ला जातो. आयुर्वेदिक औषधात या वेलाला महत्त्व असून, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड, आजरा तालुक्यांत मोहोर अधिक प्रमाणात आढळतो. जास्त पावासाळी प्रदेशातच तो दिसतो.
शहरातील अनेक मंडईत या कालावधीत जो मोहोर येतो, तो राधानगरी, गगनबावडा, करवीर तालुक्यातून येतो, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. हा मोहोर जसा पितरांच्या नैवेद्यात वापरला जातो, तसाच अन्य भाजीतही वापरला जातो. तो अन्य भाज्यांप्रमाणे मोठ्या प्रमाणात येत नाही. काही ठराविक विक्रेते किंवा शेतकऱ्यांकडे तो दिसतो. ज्यांना मोहोराचे महत्त्व माहीत आहे, ते लोक मात्र घेतात.

चौकट
चार वर्षांपूर्वी विक्रमी दर
चार वर्षांपूर्वी हा मोहोर ४०० रुपये किलोपर्यंत गेला होता, अशी माहिती काही मोहोर विक्रेत्यांनी दिली. तेव्हा कमी प्रमाणात तो मंडईत आला होता. यंदा मात्र दहा रुपयांना वाटा अशा पद्धतीने विक्री सुरू आहे. जितका पाऊस जास्त लागेल, तितका मोहोर जास्त येतो, असे म्हणतात. यावर्षी पश्‍चिम घाटात सर्वाधिक पाऊस झाला. परिणामी, मोहोराचा वेल सर्वत्र आला.
............

51001

कोथिंबीर पेंडी ७० रुपये!
कोल्हापूर, ता. १८ : एरवी पाच किंवा दहा रुपये दराने विक्री होणाऱ्या कोथिंबिरीच्या पेंडीची आज ७० रुपयांना एक याप्रमाणे विक्री झाली. गेल्या आठवड्यात चार ते पाच दिवस अतिवृष्टी झाली. परिणामी, कोथिंबिरीचे वाफे पाण्यात गेले. आलेली कोथिंबीर कुजून नष्ट झाली. ही कोथिंबीर सर्वाधिक बोरगाव (जि. सांगली) येथून येते. यानंतर ती गणेशवाडी, संकेश्‍वर, चिक्कोडी, यवलूज, जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगलेबरोबर करवीर तालुक्यातूनही येते. जिथे अतिवृष्टी झाली, तिथून कोथिंबीर आली नाही. मात्र, जिथे कमी पाऊस झाला, तिथून कमी प्रमाणात कोथिंबीर आली. यामुळे कमी आवकेमुळे प्रतिपेंडी दरात वाढ झाली. जोपर्यंत शेतातील पाणी कमी होत नाही, तोपर्यंत कोथिंबीर येणार नाही. दहा-बारा दिवसांत ती अधिक येईल, अशी माहिती विक्रेते युवराज बिसुरे यांनी दिली.
....
भाजीपाला आवकेत घट; दरातही वाढ
कोल्हापूर, ता. १८ : गेल्या आठवड्यात २० ते ३० रुपये किलोपर्यंत भाजीपाल्याचा दर गेला होता. या आठवड्यात मात्र पुन्हा दरात वाढ झाली. कारण गेल्या आठवड्यातील पावसामुळे शेतकऱ्यांनी भाजी कमी प्रमाणात आणली. २० रुपये किलोने ढब्बू मिरचीची विक्री होती. आज हीच ढब्बू मिरची ८० रुपये किलोपर्यंत गेली. अन्य फळभाज्यांच्या दरातही ६० ते ८० रुपये किलोपर्यंत वाढ झाली.

चौकट
फळभाज्या दर (प्रतिकिलो रुपये)
टोमॅटो *२०/३०
हिरवी टोमॅटो (भाजीसाठी) *१०
ढब्बू *८०
पडवळ *१० रुपयांना एक नग
शेवगा शेंग *२० रुपये पेंडी
हिरवी वांगी *६०
काळी वांगी *३०
बिनिस *१२०
काटे काकडी *४०
भेंडी *८०
कोबी *१५/२० रुपये एक नग
फ्लॉवर *१०/२० रुपयांना एक नग
भोपळा फोड *२०
मक्का कणीस *१० रुपयांना एक नग
बंदरी गवारी *४०
जवारी गवारी *८०
दुधी भोपळा *१० रुपयांना एक नग
कारली *४०
सुरण गड्डा *८०
आळू गड्डा *८०
कांदा *२०
इंदूरी बटाटा *५० रुपयांना दोन किलो
कच्ची केळी *३० रुपये डझन
लाल बीट *५ रुपये नग
मुळा *१० रुपये नग
काळा घेवडा *८०
पापडी शेंग *६०
बेळगावी गाजर *८०
हिरवी मिरची *१० रुपये
--
चौकट
पालेभाजी (प्रतिपेंडी दर)
कांदापात *१०
पोकळा *२०
लाल माट *१०
शेपू *१०
करडई *१०
मेथी *२०
तांदळी *१०
राजगिरा *१०
आंबट चुका *१०/१५
पुदिना *५/१०
कढीपत्ता *५/१०
.....
चौकट
धान्य-कडधान्ये दर‌ (प्रतिकिलो)
हिरवा मूग *९५/१००
जवारी मटकी *१६०
उंची गहू ते बन्सी गहू *३४ ते ४२
तूरडाळ *११५/१२०
हिरवा वाटाणा *८०/९०
काळा वाटाणा *८०
अखंड हरबरा *७०
हरबराडाळ *७५/८०
उडीदडाळ *१२०
अखंड उडीद *८०
मूगडाळ *१००/११०
मसूरडाळ *९०/९५
अखंड मसूर *९०/१००
बेळगावी मसूर *३२०
पावटा *१६०
हुलगा (सफेद कुळीथ) *८०/९०
पांढरी चवळी *१००
काळा घेवडा *८०
......
चौकट
फळांचे दर (प्रतिकिलो रुपये)
डाळिंब *३०/८० (आकार/ग्रेडेशननुसार)
पपई *३०/५० रुपये प्रतिनग
सीताफळ *६०
सीमला सफरचंद *१०० रुपयांना दीड किलो
माल्टा संत्री *५०
किवी *८०/१००
कवठ *२० रुपयांना एक नग
ड्रॅगन फ्रूट *५०/१००
थायलंडची गोड चिंच *१०० रुपये पॅकेट
म्हाळुंग फळ *१५०/२००
जवारी केळी *५०/६० रुपये डझन
साधी केळी *२०/३० रुपये डझन
--
ठळक चौकट
सोने-चांदीचे दर (प्रतिकिलो/प्रतितोळा) (रविवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत घेतलेले दर)
सोने- ५१,०१५ प्रतितोळा
चांदी- ५६, ७०० प्रतिकिलो
--------------
चार्ट करावा
खाद्यतेलाचे दर‌ (प्रतिकिलो/प्रतिलिटर)
सरकी *१५४
शेंगतेल *१९६
सूर्यफुल *१९५
सोयाबीन *१५०
लाकडी घाणा शेंगतेल *३१०
लाकडी घाणा करडई *३१०
लाकडी घाणा सनफ्लॉवर तेल *३१०
...
ठळक चौकट
साखर : ३६०० रुपये क्विंटल
साखर : किरकोळ दर : ३८ रुपये किलो
...

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97368 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..