शिवसेना आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना आवाहन
शिवसेना आवाहन

शिवसेना आवाहन

sakal_logo
By

पदांसाठी इच्छुक असलेल्यांनी
संपर्क साधावा ः क्षीरसागर

कोल्हापूर, ता. १८ ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांच्या शिवसैनिकांनी जिल्ह्यातील विविध पदांसाठी शनिवार पेठेतील ‘शिवालय’शी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांची शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेस राज्यभरातील जनतेतून प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनाप्रमुख ठाकरे आणि दिघे यांच्या विचारांच्या शिवसेनेची संपूर्ण महाराष्ट्र राज्यात भगवी घौडदौड सुरू करण्याचा मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्धार केला असून, त्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणी सुरू आहे. शिवसेनेशी कट्टर असणाऱ्या शिवसैनिकांनी पदाधिकारी होण्यासाठी पुढे यावे असेही क्षीरसागर यांनी या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97408 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..