नंदादिप नेत्रालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नंदादिप नेत्रालय
नंदादिप नेत्रालय

नंदादिप नेत्रालय

sakal_logo
By

51024

नंदादीप नेत्रालयात मोतिबिंदू
रुग्णांसाठी अत्याधुनिक मशिन

कोल्हापूर, ता. १८ ः नंदादीप आय हॉस्पिटलमध्ये मोतिबिंदू रुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार देणारे आयओएल मास्टर ७०० या मशिनचा लोकार्पण सोहळा झाला. या मशिनद्वारे अधिक गुंतागुंतीच्या आणि जटिल समस्यांचे अचूक व लवकर निदान करणे शक्य झाले आहे. उद्‌घाटन राज्य गुप्तवार्ता विभागाचे अप्पर उपायुक्त उमेश हजारे, डॉ. संदीप पाटील यांच्या हस्ते झाले.
हजारे यांनी नंदादीप आय हॉस्पिटलच्या या प्रयत्नांमुळे डोळ्यांच्या सर्व आजारांवरील उपचार एकाच छताखाली घेणे शक्य झाल्याचे सांगितले. डॉ. संदीप पाटील म्हणाले, ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्यांना परवडेल, अशा किमतीमध्ये आंतररष्ट्रीय दर्जाची उपचार पद्धती दिली आहे. दृष्टीसोबतच नंदादीप नेत्रालयाच्या विस्तारामुळे अनेक गरजू लोकांना रोजगाराच्या संधीही निर्माण केल्या आहेत.’’ हॉस्पिटलच्या डॉ. दिलीप पटवर्धन यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सौरभ पटवर्धन, डॉ. निधी पटवर्धन, डॉ. प्रसन्ना अराध्ये आणि डॉ. स्नेहा शिंदे उपस्थित होते. सूत्रसंचालन व्यवस्थापक रवींद्र मोहिते यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97409 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..