मृत्यूंजकार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतीदिनानिमित्त ग्रंथदिंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मृत्यूंजकार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतीदिनानिमित्त ग्रंथदिंडी
मृत्यूंजकार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतीदिनानिमित्त ग्रंथदिंडी

मृत्यूंजकार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतीदिनानिमित्त ग्रंथदिंडी

sakal_logo
By

51042
आजरा : शहरातून काढलेल्या ग्रंथदिंडीत सहभागी मान्यवर.

‘मृत्युंजय’कारांच्या स्मृतिदिनी
आजऱ्यामध्ये ग्रंथदिंडी
आजरा, ता. १८ : आजरा नगरीचे सुपुत्र, ख्यातनाम साहित्यिक मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त आजरा शहरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदितर्फे याचे नियोजन केले होते. वाचनालयात प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम झाला. व्यंकटराव हायस्कूल येथे ग्रंथदिंडीचा प्रारंभ आजरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी यांच्या हस्ते झाला. अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन झाले. गंगामाई वाचन मंदिराच्या सभागृहात वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचुळकर यांच्या हस्‍ते प्रतिमा पूजन झाले. ग्रंथदिंडीत आजरा हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल, पंडित दीनदयाळ विद्यालय व आजरा महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व अन्य मान्यवर सहभागी झाले. दि. आजरा अर्बन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, विलास नाईक, रमेश कुरुणकर, एस. पी. कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे, ज्योतीप्रसाद सावंत, सुरेश डांग, प्राचार्य सुरेश खोराटे, मुख्याध्यापक शिवाजी येसणे, भरत बुरुड, बाळासाहेब आपटे, पी. बी. पाटील, बी. एम. दरी, वाचनालयाच्या उपाध्यक्षा गीता पोतदार, इराण्णा पाटील, डॉ. सुधीर मुंज, वामन सामंत, महमदअली मुजावर, रवींद्र हुक्केरी, डॉ. अंजली देशपांडे, विद्या हरेर, पंकज कांबळे, संतोष डांग, ग्रंथपाल चंद्रकांत कोडुसकर, निखिल कळेकर, महादेव पाटील, अमृत घेवडे उपस्थित होते. कार्यवाह सदाशिव मोरे यांनी सूत्रसंचालन केले. संभाजी इंजल यांनी आभार मानले.

चौकट
मृत्युंजकारांच्या निवासस्थानी प्रतिमापूजन
मृत्यूंजकारांच्या निवासस्थानी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. या वेळी ज्योतीप्रसाद सावंत, इंद्रजित देसाई, विजय थोरवत, अश्‍विन डोंगरे, संतोष भाटले, दता पाटील, काकासो देसाई, मधुसुदन देसाई आदी उपस्थित होते.

निर्धारतर्फे अभिवादन
निर्धार प्रतिष्ठानतर्फे आजऱ्यात मृत्युंजकार शिवाजीराव सावंत यांना अभिवादन करण्यात आले. अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी व जनता एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विलास नाईक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. या वेळी अॅड. जावेद दीडबाग, सहायक फौजदार दत्ता शिंदे, हवलादर अंबुलकर, संतोष घस्ती, अॅड. सचिन इंजल, विनय सबनीस, प्रकाश सावंत, उदय चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97427 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..