धायगुडे, नंदिनी पेटकरची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धायगुडे, नंदिनी पेटकरची बाजी
धायगुडे, नंदिनी पेटकरची बाजी

धायगुडे, नंदिनी पेटकरची बाजी

sakal_logo
By

५१०४४

कोल्हापूर : स्विमिंग हबतर्फे आयोजित जलतरण स्पर्धेत रविवारी विजेत्या स्पर्धकांसह श्रीमंत शाहू छत्रपती महाराज.

धायगुडे, नंदिनी पेटकरची बाजी 
राज्यस्तर जलतरण स्पर्धा; पुणे, ठाणे जिल्ह्याचे वर्चस्व

कोल्हापूर, ता. १८ : नव्या तंत्रज्ञाच्या वापराने येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत पुणे व ठाणे जिल्ह्याच्या स्पर्धकांनी वर्चस्व राखले. स्विमिंग हबतर्फे आयोजित यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचा समारोप झाला. विजेत्यांना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
स्पर्धा १३४ प्रकारांमध्ये झाली. त्यात ५३८ खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेत खुला गट मुलांमध्ये शुभम धायगुडे, तर मुलींमध्ये नंदिनी पेटकरने बाजी मारली. अन्य निकालामध्ये ग्रुप एक मुले - तनिष कुडळे. मुली- दीक्षा यादव. ग्रुप दोन मुले - एस्. शुभम, मुली - साक्षी दांगट. ग्रुप तीन मुले - वरद भोर, शार्दूल लाटे (विभागून), मुली- निष्ठा शेट्टी. ग्रुप चार मुले - आगास्था राजा, मुली- निधी सामंत. विजेत्यांसह उपविजेत्यांना व्ही. बी. पाटील, विक्रम खाडे, उदय खाडे, राजू लिंग्रस, वैभव बेळगावकर, हनुमंत चव्हाण, डी. सी. कुंभार, नितीन जाधव, शैलजा डुनूंग आदींच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. स्विमिंग हबचे रमेश मोरे, भाऊ घोडके, उमेश कोडोलीकर, समीर चौगुले, नीलेश यादव, अजित पाटील, साईनाथ मोरे यांनी स्पर्धेचे संयोजन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97475 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..