लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण
लसीकरण

लसीकरण

sakal_logo
By

01835
सावर्डे दुमाला : येथे लसीकरणाला सुरुवात करताना गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, अनिल सोलापुरे, ग्रामस्थ यांच्यासह मान्यवर.

सावर्डे दुमालात लम्पी लसीकरण
शिरोली दुमाला : सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथे लम्पीस्कीनचा फैलाव रोखण्यासाठी गोकुळच्या वतीने लसीकरणाची सुरुवात अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत झाली. अध्यक्ष पाटील यांचा सत्कार झाला. भावेश्वरी कामधेनू पशुपालक मंडळ व बलशाली भारत संघटन यांच्यातर्फे हा उपक्रम झाला. अध्यक्षस्थानी माजी सैनिक ज्ञानदेव भोसले होते.
गोकुळचे डॉ . राहुल चौगुले यांनी लम्पीस्कीन आजाराची माहिती सांगून करावयाचे प्रतिबंधात्मक उपाय याबाबत पशुपालकांना मार्गदर्शन केले. गावातील सहा महिन्यांच्या वरील गाय, बैल जनावरांना घरोघरी जाऊन लस देण्यात आली. सर्जेराव भोसले, युवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापुरे, भगवान पाडळकर, नानासो कारंडे उपस्थित होते. स्वागत कृष्णात जगताप यांनी केले. सूत्रसंचालन राजू भोसले यांनी केले. डी. के. निकम यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97498 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..