शिवराजमधील स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेशाचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराजमधील स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेशाचे आवाहन
शिवराजमधील स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेशाचे आवाहन

शिवराजमधील स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेशाचे आवाहन

sakal_logo
By

‘शिवराज’मधील स्पर्धा परीक्षा
केंद्रात प्रवेशाचे आवाहन
गडहिंग्लज, ता. १९ : शिवराज महाविद्यालयातील कै. डॉ. एस. डी. पाटील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश प्रक्रिया सुरू असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन ‘शिवराज’चे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी विविध क्षेत्रात अधिकारी व्हावेत, यासाठी संस्थेतर्फे यावर्षीपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दरवर्षी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावेत व परीक्षेत चमकलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे अनुभव व मार्गदर्शन केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील तरुणांच्या पंखात बळकटी यावी म्हणून या केंद्रामध्ये राज्यसेवा, बँकिंग, पोलिस भरतीबाबत मार्गदर्शन होणार आहे. यासाठी स्वतंत्र स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही विविध उपक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही डॉ. कुराडे यांनी दिली. सर्वांसाठी खुला प्रवेश आहे. केंद्रातील प्रवेशासाठी समन्वयक प्रा. एन. बी. एकिले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97595 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..