अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

sakal_logo
By

51175
गडहिंग्लज : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी प्रांत कार्यालयावर काढलेला मोर्चा. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा
प्रांत कार्यालयावर धडक; गडहिंग्लजला विविध मागण्यांसाठी आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १९ : शासकीय वेतनश्रेणी, भत्ते, सेवासमाप्तीचा लाभ पूर्वलक्षीप्रभावाने देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन केले. अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी शहरातून मोर्चा काढत प्रांत कार्यालयावर धडक दिली. अंगणवाडी कर्मचारी सभेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आपल्या विविध मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी आज पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले. अंगणवाडी कर्मचारी सभेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस लक्ष्मी मंदिरात जमल्या. दुपारी दीडला तेथून मोर्चाला सुरवात झाली. बाजारपेठ, वीरशैव चौक, संकेश्‍वर रोड, मुख्य मार्गांवरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या घोषणांनी मोर्चा मार्ग दणाणून गेला. नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर मोर्चा पंचायत समितीतील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर गेला. प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी रूपाली भोसले यांनी निवेदन स्वीकारले.
शासकीय वेतश्रेणी, भत्ते व सेवासमाप्तीचा लाभ पूर्वलक्षीप्रभावाने द्यावा, मानधनवाढ व दरमहा अर्ध्या मानधनाइतकी पेन्शन द्यावी, यापूर्वी निवृत्त झालेल्यांना ग्रॅच्युईटीचा लाभ द्यावा, नवीन मोबाईल किंवा टॅब द्यावेत, पोषण ट्रॅकर अॅपमध्ये इंग्रजी भाषेत माहिती भरण्याची सक्ती करू नये, प्रोत्साहन भत्त्यात वाढ करावी, मिनी अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सेविकांइतके मानधन द्यावे, रिक्त पदे भरावीत, निवृत्त कर्मचाऱ्यांना तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना एकरकमी लाभ तातडीने मिळावा यासह विविध मागण्या निवेदनातून केल्या आहेत.
अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य संघटक बाळेश नाईक, जिल्हाध्यक्षा अंजना शारबिद्रे, तालुकाध्यक्षा राजश्री बाबन्नावर, कार्याध्यक्षा सुरेखा गायकवाड, अॅड. कुमार रेडेकर, माधवी देसाई, सोना पाटील, शोभा जाधव, भारती कुंभार, रेखा कांबळे, सपुरा खानापुरे, रूपाली नार्वेकर, वैशाली बिरंजे, रेणुका शिरगावे, गीता दावणे, मंगल लोहार यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97648 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..