पानसरे सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पानसरे सुनावणी
पानसरे सुनावणी

पानसरे सुनावणी

sakal_logo
By

पानसरे हत्या प्रकरण लोगो

चार्जफ्रेम सुनावणी
१ ऑक्टोबरला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील चार्जफ्रेमबाबतची (दोषनिश्चिती) पुढील सुनावणी १ ऑक्टोबरला होणार आहे. जिल्हा न्यायालयात आज यासंबंधीची सुनावणी होती. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी एसआयटीने (विशेष तपास पथकाने) १२ जणांवर कारवाई केली. संशयितांवर चार्जफ्रेमबाबतची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास एटीएस (दहशवाद विरोधी पथक) कडे वर्ग केला आहे. या संबंधीची पुढील सुनावणी कोल्हापुरातच व्हावी, असा प्रस्ताव एटीएसकडून शासनाला पाठविला आहे. शासनाकडून हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी विधी व न्याय विभागाकडे पाठविला आहे. दरम्यान, पानसरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर ३० सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. जिल्हा न्यायालयाने या संबंधीची पुढील सुनावणी १ ऑक्टोबरला ठेवली आहे. यावेळी विशेष सरकारी वकील ॲड. शिवाजीराव राणे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y97658 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..